शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या गुरूंचा गुरुपौर्णिमेनिमित्त महापालिकेकडून गौरव!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. ३० जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून घडविणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा गुरुपौर्णिमेनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शिक्षण समितीच्या सभापती रविना आंगोळकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
महापालिकेच्या वतीने आयोजित या सोहळ्याला नगरसदस्या प्रियांका कुदळे, योगिता बारणे, सारिका बोऱ्हाडे, कविता भोंगाळे, शिक्षण विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, पर्यवेक्षिका सुनीता गिते, खालेदा खान आणि मुख्याध्यापक पांडुरंग मुडगुण आदी मान्यवर उपस्थित होते.
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. या विद्यार्थ्यांचा आणि त्यांना अहोरात्र मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
इयत्ता ५ वी चे गुणवंत विद्यार्थी- समृद्धी ताठे, यशपाल चव्हाण, स्वरा थोरे, प्रीती गव्हाणे, आरोही शुक्ला, दुर्वा चौगले, मनस्वी तडमे आणि काव्या पाटील.
इयत्ता ८ वी चे गुणवंत विद्यार्थी- समीक्षा पानसकर, आराध्या वळवे, आदित यादव आणि अनुष्का खरात.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामागे मेहनत घेणारे शिक्षक विकास साकत, पूजा इंगळे, शीतल म्हेत्रे, वसंत मुठे, रुपाली घोडेकर, शंकर भवारी, नामदेव चव्हाण, जितेंद्र कऱ्हाड, उमेश सूर्यवंशी व सुनिता दिंडे या शिक्षकांचा सभापती रविना आंगोळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. गुरुपौर्णिमेच्या औचित्याने शिक्षकांच्या या योगदानाचा गौरव केल्याबद्दल सर्व स्तरातून महापालिका प्रशासनाचे कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

