news
Home पिंपरी चिंचवड पक्षाचे बळकटीकरण अन् तळागाळातील नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्याचे ध्येय; बासुरी बँक्वेट हॉलमध्ये पार पडला सोहळा

पक्षाचे बळकटीकरण अन् तळागाळातील नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्याचे ध्येय; बासुरी बँक्वेट हॉलमध्ये पार पडला सोहळा

'मन की बात', SIR प्रक्रिया, BLA-2 नियुक्ती अन् पदवीधर मतदार नोंदणीवर विशेष भर; भाजप पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपळे सौदागर येथे भाजप ‘शक्तीकेंद्र प्रमुख’ बैठक उत्साहात संपन्न; शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे विविध अभियानांबाबत मोलाचे मार्गदर्शन!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ३१ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपळे सौदागर येथील बासुरी बँक्वेट हॉल येथे ‘रहाटणी-पिंपळे सौदागर मंडल शक्तीकेंद्र प्रमुखांची’ महत्त्वपूर्ण बैठक भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. पक्षाचे संघटनात्मक बळकटीकरण आणि आगामी विविध अभियानांचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

उपस्थित पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले,

“भारतीय जनता पार्टीचे मजबूत संघटन हेच आपले खरे बलस्थान आहे. केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आगामी काळात ‘हर घर तिरंगा’ अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवणे, ‘SIR प्रक्रिया’ वेळेत पूर्ण करणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक बूथवर प्रभावीपणे करणे आवश्यक आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील कामांचे नियोजन करून एकजुटीने मैदानात उतरावे.”

 दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक शक्तीकेंद्र व बूथ स्तरावर भव्य स्वरूपात केले जाईल.  ‘SIR’ (मतदार यादी पुनरीक्षण) प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक बूथ स्तरावर BLA-2 (बूथ लेव्हल एजंट) यांच्या नियुक्त्या तात्काळ पूर्ण करून पुढील जबाबदाऱ्यांचे नियोजन निश्चित करण्यात आले. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त पदवीधरांची नोंदणी करून घेण्यासाठी शक्तीकेंद्र प्रमुखांना विशेष उद्दिष्टे देण्यात आली. आगामी स्वातंत्र्यदिनानिमित्त घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची विशेष आखणी करण्यात आली.

या बैठकीस नगरसेविका सौ. अनिताताई काटे, नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे, नगरसेविका सौ. सविताताई खुळे, नगरसेविका सौ. अर्चनाताई तापकीर, नगरसेविका सौ. मनीषाताई पवार, नगरसेवक श्री. बाबासाहेब त्रिभुवन, रहाटणी-पिंपळे सौदागर मंडल अध्यक्ष श्री. सोमनाथदादा तापकीर, श्री. जयनाथशेठ काटे, श्री. संदीपभाऊ गाडे, श्री. मनोजराव ब्राम्हणकर, श्री. संजयशेठ भिसे, श्री. संदीपशेठ काटे, श्री. संदेश काटे पाटील, श्री. दिनेश काटे पाटील, श्री. प्रवीणशेठ कुंजीर, श्री. बाळकृष्ण परघळे, सर्व शक्तीकेंद्र प्रमुख आणि भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!