news
Home पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाच्या आपत्कालीन पथकांकडून तातडीने मदतकार्य; १०१ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

अग्निशमन विभागाच्या आपत्कालीन पथकांकडून तातडीने मदतकार्य; १०१ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

मोठा अपघात अन् जीवितहानी टळली; २४ तास सर्व यंत्रणा सतर्क असल्याची अग्निशमन दलाची माहिती | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झाडपडीच्या घटना; पिंपरी महापालिकेच्या अग्निशमन विभागाची तातडीने मदतकार्य!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: मागील दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यांमुळे शहरातील विविध भागात झाडे आणि मोठ्या फांद्या कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्त्यांवरील झाडे व फांद्या हटवून वाहतूक सुरळीत करत परिसर सुरक्षित केला आहे.

गेल्या दोन दिवसांत शहरातील सेक्टर २४, निगडी प्राधिकरण, फिनोलेक्स कंपनी परिसर, पिंपरी, ओम साई हौसिंग सोसायटी, आकुर्डी,  काजळे पेट्रोल पंप शेजारी, पुणे-नाशिक महामार्ग भागांत झाडे आणि फांद्या पडल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. अग्निशमन विभागाच्या आपत्कालीन पथकांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी पोहोचून अडथळे दूर केले, ज्यामुळे मोठा अपघात किंवा जीवितहानी टळली आहे.

पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडे आणि फांद्या तुटण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाने नागरिकांना  खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तात्काळ १०१ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. झाड कोसळलेल्या किंवा आपत्तीच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नका.  तुटलेल्या फांद्यांसोबतच विजेच्या तारा किंवा उघड्या वायर्सपासून सुरक्षित अंतर ठेवा. पडलेली झाडे किंवा धोकादायक फांद्या स्वतःहून हटवण्याचा प्रयत्न न करता अग्निशमन दलाच्या मदतीची वाट पाहा. अग्निशमन विभागाची सर्व आपत्कालीन पथके २४ तास सज्ज असून नागरिक आणि वाहतुकीच्या सुरक्षेसाठी सतर्कतेने कार्यरत आहेत.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!