पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार; जुलै २०२६ अखेर झाले सेवानिवृत्त!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. १ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून जुलै २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या २१ तसेच स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतलेल्या १४ अशा एकूण ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महापालिकेच्या वतीने नुकताच सपत्निक व सस्नेह सत्कार करण्यात आला. मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार सोहळ्यास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे, नंदकुमार इंदलकर, मुख्य लिपिक माया वाकडे, विविध विभागांतील कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लेखाधिकारी प्रकाश ज्ञानोबा जाधव, कार्यालय अधीक्षक दौलत मदगे, सहाय्यक उद्यान निरीक्षक सुरेश कोळेकर, कॉम्प्युटर ऑपरेटर सुरेखा झेंडे, ज्ञानेश्वर शेडगे, मुख्याध्यापक सविता जाधव, जयश्री गळीतकर, उपशिक्षिका संगीता रोकडे, उज्ज्वला तापकीर, आणि शिला सोनवणे. सर्व्हेअर मुकुंद क्षीरसागर, सुरक्षा सुपरवायझर भारत भले, रखवालदार राजेंद्र रायकर, ईश्वर बहोत, चंद्रकांत राऊळ, मजूर दत्तात्रय काळभोर, दत्तात्रय टोपे, दिलीप गव्हाणे, शंकर धुमाळ तसेच सफाई सेवक अशोक कांबळे व ज्योतीराम खैरमोडे.
उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अरुण सुपे, कार्यकारी अभियंता राजेंद्र जावळे, मनोहर जावरानी, वायरलेस ऑपरेटर श्रीकृष्ण बाबर, दूरध्वनी चालक जालिंदर साखरे, मुकादम राकेश गायकवाड, वंदना ओव्हाळ, शालन करडे, सफाई कामगार राजू शिंदे, बापू गायकवाड, अनिता रेड्डी, नमिना चव्हाण, सफाई सेवक राणू गायकवाड आणि भारत गायकवाड. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले, सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर उपस्थितांचे आभार माया वाकडे यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


