news
पिंपळे गुरव प्रभाग २९ मधील स्मशानभूमीत चुकीच्या रचनेमुळे अपघात घडण्याचा धोका; स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांना दिले निवेदनपंढरपूरहून विठुरायाचे दर्शन घेऊन देहूच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्याचे पिंपरी गावात उत्साहात आगमनतक्रारींची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करण्याचे आदेश; रस्ते, पदपथ, रेलिंग व दुभाजकांच्या दुरुस्तीला वेगमुसळधार पावसात कार्यालयात पाणी शिरून कागदपत्रे भिजली; सुरक्षेच्या कारणास्तव दापोडीत तात्पुरते स्थलांतरदि. १६ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थींना मिळाले नाट्यनिर्मिती आणि कॅमेऱ्यासमोरील अभिनयाचे धडे
Home पिंपरी चिंचवड मुद्रांक शुल्क माफी आणि बँक हप्ते महापालिकेने भरण्याची प्रमुख मागणी; कष्टकरी संघर्ष महासंघाच्या चिंचवड कार्यालयात लाभार्थींची भव्य बैठक संपन्न

मुद्रांक शुल्क माफी आणि बँक हप्ते महापालिकेने भरण्याची प्रमुख मागणी; कष्टकरी संघर्ष महासंघाच्या चिंचवड कार्यालयात लाभार्थींची भव्य बैठक संपन्न

बँक हप्ते महापालिकेने भरा अन् मुद्रांक शुल्क माफ करा; काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली किवळे लाभार्थ्यांचा एल्गार | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

किवळे गृहप्रकल्प लाभार्थींचा अंत पाहू नका; ८ दिवसांत ताबा न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा! कामगार नेते काशिनाथ नखाते आक्रमक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. ९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे किवळे येथील गृहप्रकल्पातील शेकडो गरीब व कष्टकरी लाभार्थी गेल्या पाच वर्षांपासून आर्थिक व मानसिक पिळवणुकीला सामोरे जात आहेत. रावेत येथील प्रकल्प महापालिकेच्या चुकीमुळे रद्द झाल्यानंतर किवळे गृहप्रकल्पातील घरे दुप्पट दराने लाभार्थ्यांच्या माथी मारण्यात आली. बँक कर्ज मंजूर होऊन हप्ते सुरू झाले तरीही महापालिका प्रशासनाकडून घरांचा ताबा देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या ८ दिवसांत लाभार्थ्यांना घरांचा ताबा न दिल्यास महापालिकेविरोधात एल्गार पुकारत तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा कष्टकरी, वंचित व शोषितांचे खंदे पाठीराखे तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.

कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड येथील मध्यवर्ती कार्यालयात किवळे गृहप्रकल्पातील सर्व बाधित लाभार्थींची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित शेकडो लाभार्थ्यांनी आपल्या व्यथा आणि महापालिका प्रशासनाकडून होणारा त्रास मांडला.
यावेळी बोलताना जनसामान्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे नेते काशिनाथ नखाते म्हणाले की:
“महापालिकेने दिशाभूल करून अर्ज स्वीकारले. गेल्या ५ वर्षांपासून सामान्य नागरिकांना प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. अनेक लाभार्थ्यांच्या बँकेचे कर्ज मंजूर होऊन ४ ते ६ महिन्यांपासून हप्ते (EMIs) सुरू झाले आहेत. एकीकडे राहत्या घराचे भाडे आणि दुसरीकडे बँकेचे हप्ते असा दुहेरी आर्थिक फटका या कष्टकऱ्यांना बसत आहे. महापालिका आवश्यक कागदपत्रे देत नसून जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम सुरू आहे.”

कष्टकरी आणि गरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत काशिनाथ नखाते यांनी प्रशासनासमोर प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.  किवळे गृहप्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना येत्या ८ दिवसांत घरांचा ताबा देण्यात यावा. जोपर्यंत घरांचा प्रत्यक्ष ताबा मिळत नाही, तोपर्यंत लाभार्थ्यांच्या बँकेचे हप्ते पिंपरी-चिंचवड महापालिकेने भरावेत.  दिलेले आश्वासन पाळत लाभार्थ्यांचे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) माफ करून तात्काळ रजिस्ट्रेशन करून देण्यात यावे. गृहप्रकल्प परिसरात सर्व आवश्यक नागरी व मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यात याव्यात. पंतप्रधान आवास योजने‘अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळणारे शासकीय अर्थसहाय्य तात्काळ वर्ग करण्यात यावे.

पिंपरी-चिंचवड शहरातील असंघटित कामगार, फेरीवाले आणि घरवंचितांच्या न्याय्य हक्कांसाठी नेहमीच रस्त्यावर उतरून लढा देणारे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी याआधीही दोन वेळा या मुद्द्यावर यशस्वी आंदोलने केली आहेत. महापालिका प्रशासनाने जर आठ दिवसांत योग्य पावले उचलली नाहीत, तर शहरात महापालिकेच्या भ्रष्ट व निष्क्रीय कारभाराविरोधात अभूतपूर्व जनआंदोलन उभारले जाईल, असा ठाम निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीस किवळे गृहप्रकल्पातील नागरिक, महिला व कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!