news
पिंपळे गुरव प्रभाग २९ मधील स्मशानभूमीत चुकीच्या रचनेमुळे अपघात घडण्याचा धोका; स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांना दिले निवेदनपंढरपूरहून विठुरायाचे दर्शन घेऊन देहूच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्याचे पिंपरी गावात उत्साहात आगमनतक्रारींची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करण्याचे आदेश; रस्ते, पदपथ, रेलिंग व दुभाजकांच्या दुरुस्तीला वेगमुसळधार पावसात कार्यालयात पाणी शिरून कागदपत्रे भिजली; सुरक्षेच्या कारणास्तव दापोडीत तात्पुरते स्थलांतरदि. १६ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थींना मिळाले नाट्यनिर्मिती आणि कॅमेऱ्यासमोरील अभिनयाचे धडे
Home मुख्यपृष्ठ सातव्या वेतन आयोगानुसार रजा रोखीकरण लागू; उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ६ ऑगस्ट रोजी शासन निर्णय (GR) निर्गमित

सातव्या वेतन आयोगानुसार रजा रोखीकरण लागू; उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ६ ऑगस्ट रोजी शासन निर्णय (GR) निर्गमित

सातव्या वेतन आयोगानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण लागू; उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून शासन निर्णय निर्गमित | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

राज्यभरातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; रजा रोखीकरणाबाबत (Leave Encashment) बहुप्रतिक्षित शासन निर्णय अखेर जाहीर!

मुंबई/पिंपरी, प्रतिनिधी आकाश कांबळे दि. ९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

मुंबई: महाराष्ट्रातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण (Leave Encashment) लागू करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अखेर जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
अशासकीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ (मुंबई) तसेच महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ (कल्याण) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन वसंतराव डावखरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंगळवारी (४ ऑगस्ट) मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा झाली, ज्यामध्ये रजा रोखीकरणाचा मुद्दा (मुद्दा क्र. ३) प्रामुख्याने मांडण्यात आला होता.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ही रास्त मागणी लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आणि उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ निर्णय घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्या अनुषंगाने दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी शासनाने याबाबतचा अध्यादेश जारी केला.

शासनाच्या या सकारात्मक निर्णयाबद्दल विविध शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील, आमदार ॲड. निरंजन डावखरे आणि उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

मंत्रालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीस लोकप्रतिनिधी व मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार ॲड. निरंजन डावखरे, प्रशासकीय अधिकारी,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, वित्त विभागाचे सह-सचिव डॉ. माधव वीर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण उपसचिव प्रताप लुबाळ, कक्ष अधिकारी विनायक टीमके, सह-संचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, महासंघाचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजा बढे, सरचिटणीस सुजित आर. बी. सिंग, चिटणीस दिलीप मोरे, तसेच दिलीप पवार, अनिल लबरे, सुहास भगत, आशुतोष लाडे आणि अशोक जाधव प्रमुख मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

 

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!