news
दिल्ली व महाराष्ट्रातील नामांकित संस्थांमध्ये मिळणार प्रशिक्षण; दरमहा १०,००० ते १३,००० रुपये विद्यावेतन आणि पुस्तकांसाठी आर्थिक मदतज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे शोकसभेचे आयोजन; तृतीयपंथी समाजाच्या प्रमुखांची आणि गुरूंची विशेष उपस्थितीस्वच्छता ही केवळ सफाई कामगारांची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी — महापौर रवि लांडगेअनुसूचित जातीतील ५८ जातींचे पाठिंबा; मातंग समाजातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांचाही भव्य सहभाग लाभणारकिवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांना तातडीने ताबा द्या आणि महापालिकेच्या चुकीचा आर्थिक भुर्दंड नागरिकांवर टाकू नका; काशिनाथ नखाते आक्रमक
Home पिंपरी चिंचवड ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे शोकसभेचे आयोजन; तृतीयपंथी समाजाच्या प्रमुखांची आणि गुरूंची विशेष उपस्थिती

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे शोकसभेचे आयोजन; तृतीयपंथी समाजाच्या प्रमुखांची आणि गुरूंची विशेष उपस्थिती

पिंपरीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात शोकसभा; डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांना ‘नारी द वुमन’ एनजीओ आणि तृतीयपंथी समाजाकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करणारे थोर शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातील तृतीयपंथी समाज आणि ‘नारी द वुमन’ या एनजीओच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील ‘नारी द वुमन’ समुपदेशन केंद्रात या विशेष शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेला ‘नारी द वुमन’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ शेख आणि सचिव अर्चना मेंगडे यांच्यासह तृतीयपंथी समाजातील सर्व प्रमुख आणि गुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने नेहमीच तृतीयपंथी समाजाच्या भावना व गरजा समजून घेत सामाजिक बांधीलकी जपली आहे. या रुग्णालयामार्फत दरवर्षी तृतीयपंथी घटकांसाठी मोफत आरोग्य तपासणी (Health Checkup) आणि विविध आजारांवर मोफत उपचार केले जातात. रुग्णालयाचे डीन चव्हाण साहेब आणि प्रमोद पाटील हे रात्री-अपरात्री या घटकाच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात, याबद्दल शोकसभेत आदराने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
“डॉ. डी. वाय. पाटील यांच्या नावाने शहरात सुरू असलेले रुग्णालय हे तृतीयपंथी समाजासाठी नेहमीच हक्काचा आधार ठरले आहे. रात्री-अपरात्री आरोग्य विषयक कोणतीही अडचण आल्यास डॉ. चव्हाण आणि प्रमोद पाटील हे तातडीने मदत करतात. अशा थोर, संवेदनशील विचारसरणीच्या विभूतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज संपूर्ण तृतीयपंथी समाज आणि आमची संस्था येथे एकवटली आहे.”
— अर्चना मेंगडे (सचिव, नारी द वुमन एनजीओ)

या शोकसभेस दत्ता नलावडे, पायल अमर पवार, शारदा पवार, आयुष पवार, गणेश नांगरे, अजय खवळे, किरण वाघ, शुभम सोनवणे, विल्यम नायडू यांच्यासह तृतीयपंथी समाजातील इतर प्रतिनिधी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मौन बाळगून श्रद्धांजली वाहिली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!