news
Home पिंपरी चिंचवड कामाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करा, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या (CZA) नियमांनुसार मान्यता मिळवून प्राणिसंग्रहालय तात्काळ खुले करा; सामाजिक कार्यकर्त्यांची आग्रही मागणी

कामाचे निश्चित वेळापत्रक जाहीर करा, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या (CZA) नियमांनुसार मान्यता मिळवून प्राणिसंग्रहालय तात्काळ खुले करा; सामाजिक कार्यकर्त्यांची आग्रही मागणी

बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे काम पूर्ण करून तात्काळ खुले करा; गणेश भांडवलकर यांचे आयुक्तांना जनहित निवेदन | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चिंचवडच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे काम पूर्ण करून ते त्वरित सुरू करा; गणेश भांडवलकर यांचे महापालिका आयुक्तांना जनहित निवेदन!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिंचवड, संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरणाचे काम गेली अनेक वर्षे अत्यंत संथ गतीने सुरू असून ते तात्काळ पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी आग्रही मागणी पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते गणेश नवनाथ भांडवलकर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या (Central Zoo Authority – CZA) अधिकृत नोंदीनुसार २.८५ हेक्टर क्षेत्रफळात पसरलेले हे ‘स्मॉल झू’ नूतनीकरणाच्या नावाखाली दीर्घकाळ बंद आहे. यामुळे शहरातील लहान मुले, विद्यार्थी, निसर्गप्रेमी आणि नागरिक एका महत्त्वाच्या सार्वजनिक व शैक्षणिक सुविधेपासून वंचित राहिले आहेत.

 प्रलंबित कामांचे तांत्रिक व प्रशासकीय परीक्षण (Audit) करून प्राणिसंग्रहालय सुरू करण्याचे निश्चित वेळापत्रक महापालिकेने जाहीर करावे. आवश्यक बांधकाम, अभ्यागतांची सुरक्षा, प्राणी-कल्याण, पशुवैद्यकीय सुविधा आणि इतर पायाभूत कामे पूर्ण करून प्राणिसंग्रहालय लवकरात लवकर सुरू करावे. ‘सेंट्रल झू अथॉरिटी’ (CZA) च्या निकषांनुसार आवश्यक मान्यता, पुनर्मान्यता (Recognition) व वैधानिक परवानग्या वेळेत पूर्ण कराव्यात.  पूर्ण प्राणिसंग्रहालय सुरू होईपर्यंत कायदेशीर चौकटीत राहून ज्या सुविधा शक्य आहेत, त्या टप्प्याटप्प्याने (Phase-wise) सुरू करण्याबाबत स्वतंत्र अहवाल तयार करावा. आतापर्यंत झालेला निधीचा खर्च, उर्वरित अंदाजित खर्च, कंत्राटदारांचे तपशील आणि प्रलंबित कामांची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर पारदर्शकपणे प्रसिद्ध करावी.  प्राणी ठेवण्याबाबत किंवा आणण्याबाबतचा कोणताही निर्णय केवळ CZA च्या मान्यताप्राप्त नियमांनुसार आणि प्राण्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊनच घेतला जावा. निवेदनावर महापालिका प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल निवेदकाला पाठवण्यात यावा.

हे निवेदन कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरोधात नसून, करदात्या नागरिकांच्या सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या सुविधेचा सुरक्षित, कायदेशीर आणि योग्य पद्धतीने नागरिकांना लाभ मिळावा, याच उद्देशाने दिल्याचे गणेश भांडवलकर यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका प्रशासनाने यावर तात्काळ गांभीर्याने पावले उचलून ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!