news
Home पिंपरी चिंचवड वाल्मिकी, वडार आणि मादिगा समाजाचाही पाठिंबा; चिंचवड स्टेशन ते निगडी तहसील कार्यालयादरम्यान धडकणार मोर्चा

वाल्मिकी, वडार आणि मादिगा समाजाचाही पाठिंबा; चिंचवड स्टेशन ते निगडी तहसील कार्यालयादरम्यान धडकणार मोर्चा

आरक्षण उपवर्गीकरणासाठी पिंपरीत १८ ऑगस्टला 'जनआक्रोश महामोर्चा'; वाल्मिकी, वडार व मादिगा समाजाचा पाठिंबा | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

१८ ऑगस्टला पिंपरी-चिंचवडमध्ये आरक्षण उपवर्गीकरणासाठी ‘जनआक्रोश महामोर्चा’; ५८ जातींचा पाठिंबा आणि मातंग समाजातील नेत्यांचा भव्य सहभाग!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: अनुसूचित जातीतील (SC) आरक्षणाचा लाभ समाजातील शेवटच्या आणि वंचितांपर्यंत पोहोचावा आणि आरक्षणाचा योग्य व न्याय्य वाटा सर्व घटकांना मिळावा, या मागणीसाठी १८ ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य ‘जनआक्रोश महामोर्चा’ चे आयोजन करण्यात आले आहे. आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या महामोर्चात अनुसूचित जातीतील ५८ जातींचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, महाराष्ट्रातील मातंग समाजातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांनुसार समाजातील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी मिळणे गरजेचे आहे. आरक्षणाचा अपेक्षित लाभ ज्या घटकांपर्यंत अद्याप पोहोचलेला नाही, त्यांच्यापर्यंत तो पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याची भूमिका समितीने मांडली आहे.
उपवर्गीकरणाला काही संघटनांकडून विरोध होत असला, तरी कोणाचेही आरक्षण काढून घेणे हा यामागील उद्देश नसून आरक्षणाचा लाभ अधिक गरजू आणि वंचित घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हाच मुख्य हेतू असल्याचे समितीने स्पष्ट केले.

या महामोर्चाला वाल्मिकी समाज, वडार समाज आणि मादिगा समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे. सामाजिक नेते मारुती पंद्री, ॲड. सुशील मंचरकर आणि भारत विटकर यांच्यासह विविध घटकांच्या सहभागामुळे या आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.

  • दिनांक व वेळ: मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ (सकाळी १०:०० वाजता)
  • प्रारंभ: आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, चिंचवड स्टेशन.
  • मार्ग व सांगता: चिंचवड स्टेशनवरून निघून हा मोर्चा निगडीच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि निगडी येथील तहसील कार्यालयासमोर त्याची सांगता होईल.

या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेला आमदार अमित गोरखे, बापू घोलप, भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, अनिल सौंदडे, ॲड. सुशील मंचरकर, नेताजी शिंदे, गणेश लोंढे, गणेश अवघडे, भारत विटकर, मारुती पंद्री, मनोज तोरडमल, मयूर जाधव, संदीप जाधव, चंद्रकांत लोंढे, मारुती जाधव, अविनाश शिंदे, बाबासाहेब रसाळ, बाबासाहेब पाटोळे, अरुण जोगदंड, संजय ससाने, नितीन घोलप, सुनील भिसे, सूरज कांबळे, आशाताई बापू वाघमारे, कृष्णा साबळे, शहाणे भानुदास नेटके, भगवान शिंदे, युवराज दाखले, सुरेश जोगदंड, शिवाजी साळवे, सतीश भवाळ, अविनाश लोणारी, संजय एडके, राजू आवळे, विठ्ठल झिंजुर्डे, नाना कांबळे, भाऊ कसबे, मारुती सोनटक्के, सागर कापसे, प्रसाद केसरे, स्वप्नील वाघमारे, मयूर घोलप, शंकर खवळे, ऋषी वाघमारे, शिवाजी खडसे, सुरज कांबळे, महादेव आडागळे, योगेश लोंढे यांच्यासह इतर अनेक समाजबांधव उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!