news
Home पिंपरी चिंचवड गेल्या साडेपाच महिन्यांपासून रिक्त असलेल्या महत्त्वाच्या पदाला अखेर पूर्णवेळ अधिकारी; मनपा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

गेल्या साडेपाच महिन्यांपासून रिक्त असलेल्या महत्त्वाच्या पदाला अखेर पूर्णवेळ अधिकारी; मनपा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अखेर पिंपरी महापालिकेला लाभले पूर्णवेळ शहर अभियंता; मनोज सेठिया यांच्या नियुक्तीने विकासकामांना मिळणार गती | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अखेर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर अभियंतापदी मनोज सेठिया यांची नियुक्ती; शाश्वत विकासावर आणि लोकाभिमुख कामांवर राहणार भर!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: शहराच्या पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महापालिकेच्या शहर अभियंतापदी अखेर ज्येष्ठ अधिकारी मनोज सेठिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या साडेपाच महिन्यांपासून हे पद रिक्त होते. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नियमानुसार ही नियुक्ती केली असून, यामुळे पिंपरी-चिंचवड पालिकेच्या कारभाराला आणि शहराच्या रखडलेल्या विकासकामांना आता मोठी गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभाग, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांचा दीर्घ अनुभव असलेल्या मनोज सेठिया यांच्या नियुक्तीचे शहरवासीयांकडून स्वागत केले जात आहे.

आपल्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना मनोज सेठिया यांनी शहराच्या शाश्वत आणि पारदर्शक विकासाचा संकल्प व्यक्त केला.
“विनाविलंब लोकाभिमुख आणि दर्जेदार कामे करण्यास माझे प्रथम प्राधान्य राहील. महापालिकेच्या तिजोरीत जास्तीत जास्त महसूल कसा जमा होईल, हे पाहतानाच अनावश्यक खर्चाला आळा घातला जाईल. विशेषतः नागरिकांची अत्यंत निकडीची गरज विचारात घेऊन बांधकाम परवानगीच्या प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यावर आमचा भर असेल. शहरातील पायाभूत सोयी-सुविधा लोकोपयोगी आणि उच्च दर्जाच्या असतील,”
— मनोज सेठिया (शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका)

महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम ठेवताना नागरिकांना जलद सेवा पुरवणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सेठिया यांनी स्पष्ट केले. शहरात नागरिकांच्या थेट फायद्याची आणि दर्जात्मक कामे केली जातील. तसेच सर्वसामान्यांना पालिका दरबारी कामांसाठी फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी कामकाज अधिक गतीमान केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मनोज सेठिया यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि धोरणात्मक निर्णयक्षमतेचा पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील नियोजनात मोठा फायदा होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!