news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड शहरात भाजपच्या वतीने ‘विभाजन विभिषिका दिन’ निमित्त विशेष सभा संपन्न

पिंपरी-चिंचवड शहरात भाजपच्या वतीने ‘विभाजन विभिषिका दिन’ निमित्त विशेष सभा संपन्न

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपतर्फे 'विभाजन विभिषिका दिन' साजरा; बी. टी. अडवाणी धर्मशाळेत विशेष सभा संपन्न | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

इंग्लंडमध्ये भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली — डॉ. हेमदेव थापर

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: भारतीय जनता पक्ष पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी बी. टी. अडवाणी धर्मशाळा (पिंपरी) येथे ‘विभाजन विभिषिका दिन’ म्हणजेच अखंड भारताच्या फाळणीच्या काळ्या दिवसाच्या स्मृतीप्रत्यर्थ विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी प्रमुख वक्ता म्हणून डॉ. हेमदेव थापर उपस्थित होते.
सभेत मार्गदर्शन करताना डॉ. थापर म्हणाले की, “१९३० साली इंग्लंडमध्ये आयोजित एका परिषदेत एका मुस्लिम नेत्याने वेगळ्या देशाची मागणी करून फाळणीची बीजे रोवली. पुढे १९३७ मध्ये मुस्लिम लीगने ‘पाकिस्तान’ या नावाची कल्पना पसरवली आणि १९४७ च्या भीषण परिस्थितीचा फायदा घेत देशाची हिंसक फाळणी घडवून आणली.”

स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी ५४२ संस्थाने भारतात विलीन केली. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीर संस्थानाला वेगळा पंतप्रधान, वेगळे निशाण आणि वेगळे संविधान करण्याची मुभा दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानातील कलम ३७० रद्द करून पंडित नेहरूंनी त्या वेळी घेतलेल्या निर्णयाला पूर्णविराम दिला असून, आज काश्मीर भारताचे पूर्ण अधिकारसंपन्न घटकराज्य बनले आहे, असे प्रतिपादन डॉ. थापर यांनी केले.

या सभेस शहराध्यक्ष शत्रुघ्नबापू काटे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे प्रदेश सहसंयोजक अनुप मोरे, जिल्हा संयोजक मोरेश्वर शेडगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडये, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पलांडे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, गटनेते प्रशांत शितोळे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, स्थायी समितीच्या माजी सभापती उषाताई वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, सचिन तापकीर, प्रवक्ते राजु दुर्गे, अजित कुलथे, मंडलाध्यक्ष मोहन राऊत, मंगेश धाडगे, शिवराज लांडगे, धरम वाघमारे, मनिष पंजाबी, कुणाल साठे, ऋषिकेश वाघेरे, गणेश ढाकणे, कैलास सानप, नंदू भोगले, सचिन राऊत, महेश मोटवानी, सुरेश हेमनानी, गोपाल केसवानी, हिरालाल रिझवानी, हेमंत राजस्थ, यशवंत भोसले, उषा वाघेरे, अनिता वाळुंजकर, विशाल वाळुंजकर, रवींद्र देशपांडे, बिभीषण चौधरी, संजय पटनी, आरती चोंधे, संतोष तापकीर, मदन गोयल, मामा मारणे, सुधीर कुदळे, ओमप्रकाश शर्मा, रवींद्र नांदूरकर, खंडूदेव कठारे, सत्यपाल गोयल, संतोष ओझा यांच्यासह सिंधी समाजातील व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. नानिक पंजाबी यांनी केले. सूत्रसंचालन भाजप संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी केले, तर आभार सामाजिक कार्यकर्ते मनोहर जेठवानी यांनी मानले. या कार्यक्रमाचे नेटके संयोजन ऍड. नानिक पंजाबी, मनोहर जेठवानी, श्रीचंद नागरानी, ज्योतीका मलकानी, आतम प्रकाश मताई यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!