32
अटल राष्ट्रगर्जना काव्यसंध्येच्या सूरमयी वातावरणात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींना भावपूर्ण आदरांजली!
मूर्तिजापूर/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. १८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
मूर्तिजापूर: मूर्तिजापूर येथील स्थानिक आशीर्वाद लॉन्स (तिडके नगर) येथे ‘अटल फाउंडेशन’च्या राष्ट्रीय अध्यक्षा अपर्णा सिंह आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश राजे यांच्या सूचनेनुसार, प्रदेश महामंत्री विष्णू लोडम व जिल्हाध्यक्ष रूपाली तिडके यांच्या नेतृत्वाखाली माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘अटल राष्ट्रगर्जना काव्यसंध्या – अटल प्रेमाचे राष्ट्र सूर’ या भव्य काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. स्वाती पोटे आणि सृजन साहित्य संघाचे रवींद्र जवादे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पूजन करून झाली. या प्रसंगी अटल फाउंडेशनच्या वतीने मरणोत्तर देहदानाचा संकल्प करणारे समाजसेवक दामोदर गुल्हाने व प्रा. सुधाकर गौरखेडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार हरीश पिंपळे यांनी उपस्थितांना संबोधित करताना अटलजींच्या अलौकिक कर्तृत्वाला उजाळा दिला. वाजपेयी यांच्या महानिर्व्हाणानंतरच्या अस्थिकलश विसर्जनाच्या भावनिक आठवणींना उजाळा देताना आमदार पिंपळे भावूक झाले.
“अटलजींचे जाणे ही देशाची भरून न निघणारी हानी होती. अस्थिकलश हातात असताना संपूर्ण देश कसा स्तब्ध आणि शोकाकुल झाला होता, तो क्षण आजही अंगावर काटा आणतो. अटलजींच्या स्वप्नातील समर्थ आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या तत्त्वांच्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”— हरीश पिंपळे (आमदार)
आयोजित कवी संमेलनात डॉ. स्वाती पोटे, रवींद्र जवादे, मीना जवादे, दिनकर ठाकरे, सुनील ठाकूर, विमल सरोदे, राजेंद्र भटकर, सुनील ढोकणे, अमीर हुसेन, कमल नारायण जयस्वाल, राम कृष्ण आसरे व विनोद महल्ले यांनी आपल्या राष्ट्रभक्तीपर रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली आणि वातावरण संवेदनशील केले.

या सोहळ्यास संत गजानन महाराज संस्थेच्या नूतन पिंपळे, ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या सुनिता लोडम, भाजप राज्य परिषद सदस्य राजकुमार नाचणे, युवा उद्योजक प्रशांत हजारी, भूषण कोकाटे, अविनाश यावले, आरती पोळकट, नगरसेवक गजानन नाकट, सुनील लशुवानी, सुभाष गोसावी, रितेश सबाजकर, गजानन पोळकट, प्रमोद टाले, अविनाश बांबल, विनोद देवके, ओम शांतीच्या मुक्ता दीदी सगणे, मीरा बोंडे यांच्यासह परिसरातील नागरिक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अरविंद ठाकरे यांनी केले, तर आभार अमीर हुसेन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कविता साखरे, माया दवंडे, शिवकन्या, कु. शिवानी श्रीराव, निरंजन सोळंके, रूपाली गावंडे, रूपाली गुल्हाने, आर्या मानकर, संजय गिरी, कैलास गचके व राणे काका यांनी परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

