news
Home अमरावती तथागत टीव्ही चॅनलच्या वतीने सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन

तथागत टीव्ही चॅनलच्या वतीने सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन

स्वातंत्र्यदिनानिमित्त अमरावतीत 'आंबेडकरी काव्य-गझल मुशायरा'; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

स्वातंत्र्यदिनानिमित्त अमरावतीत आंबेडकरी काव्य-गझल मुशायरा उत्साहात संपन्न; वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांचा गौरव!

अमरावती/पिंपरी प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. १८ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त ‘तथागत टीव्ही चॅनल’ अमरावती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘आंबेडकरी काव्य-गझल मुशायरा’ अत्यंत उत्साहात पार पडला. शनिवारी (दि. १५ ऑगस्ट २०२६) अमरावती येथील नक्षत्र महाविद्यालय परिसरातील अजिंठा सभागृहात हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रभक्तीपर आणि बुद्ध-भीम गीतांच्या सादरीकरणाने झाली. वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या परिवर्तनवादी विचारांना उजाळा देत आंबेडकरी विचार, सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा जागर काव्य व गझलांच्या माध्यमातून करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व दानदाते डॉ. कमलजी राऊत होते, तर उद्घाटन दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्राचार्य डॉ. कमलाकर पायस यांच्या हस्ते झाले.

या सोहळ्यात सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता व कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खालील मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. कॅप्टन डी. सी. मोहन १९५६ मधील महान कार्याबद्दल मरणोत्तर गौरव, पुंडलीकराव देशमुख चीफ ब्युरो, तथागत टीव्ही चॅनल, भाई प्रफुल्ल मंदा श्रीधर विभागीय समन्वयक, सृजन मराठी साहित्य परिषद, सौ. रजनीताई धनंजयराव गुढदेकर वीरपुत्र माता-पिता, रामभाऊ भिमटे उपासक तथा ग्रंथवाचक, नयन मोंडे विदर्भ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अमोल उल्हास मनवर महाराष्ट्र स्टेट वाईल्ड लाईफ फोटोग्राफी २०२६ विजेते, सायली जुमळे बाल रंगभूमी परिषद महाराष्ट्र, रत्नाकर सिरसाट: नाट्य दिग्दर्शक.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शिवा प्रधान, महेंद्र भालेराव, डॉ. धनराजजी चक्रे, इंजि. प्राचार्य डॉ. संजय खडसे आणि सुरेंद्रजी घरडे उपस्थित होते. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन सोमेश्वर मोहोडवंदना खोब्रागडे यांनी केले, प्रास्ताविक अरुण वानखडेदिपकराव इंगळे यांनी केले, तर आभार सुनीता रायबोलेबाबुराव छापाणी यांनी मानले.

दुपारी ३ वाजता आयोजित कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रविण कांबळे (शब्दास्त्र प्रमुख) तर स्वागताध्यक्ष अविनाश गोंडाणे (विद्रोही) होते. या सत्रात अरुण वानखडे, देवानंद पाटील, पद्माकर मांडवधरे, दिलीप शापा मोहन, रामसाहेब चव्हाण, विशाल मोहोड, नर्गिस अली, श्री. न. डोंगरे, प्रा. अरुण बुंदेले, सुनीता मेश्राम, रिजवान शेख, पल्लवी मते, मयूर गायकवाड, प्रज्ञा घरडे, महादेव बागडे, प्रेरणा पांडे, अब्दुल समदं रजा, संध्या संभे, सुशांत मेश्राम, मधुभाऊ हिरेकर, प्रनोती शेंडे, रेखा राऊत, गोवर्धन रामटेके, सिद्धार्थ गोंडाने, उल्हास मनोहर (नागपूर), देवीलाल रौराळे आणि डॉ. अजय खडसे या कवी-गझलकारांनी आपल्या ओजस्वी रचनांतून सामाजिक परिवर्तनाचा व अन्यायाविरोधातील संघर्षाचा संदेश दिला. या सत्राचे संचालन पवन डोंगरेसुनीता रायबोले यांनी केले, तर आभार शिलाताई बागडे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तथागत टीव्ही चॅनलचे मुख्य संचालक अरुण वानखडे, संपादक दिलीप तायडे, उपसंपादक डॉ. अविनाश सवाई, वंदना खोब्रागडे, सुनीताताई रायबोले, बाबुराव छापाणी, डॉ. भन्ते संघपाल (जिवंक), सोमेश्वर मोहोड, दीपक इंगळे, पुंडलिकराव देशमुख, ऍड. किरण रगडे, मदन खंडारे, मनोहर इंगळे, रामभाऊ भीमटे, ईश्वर यादव, राधाताई कांबळे, संगीता बनसोड, मालतीताई मोहोड, उदयभान वाघमारे, गंगाधर सरदार, सुलोचना जामनिक, शिलाताई बागडे, शंकूतला गुडधे, सीमाताई मेश्राम आणि डॉ. अविनाश गवई यांनी परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!