news
जमावबंदी आदेशावरून काँग्रेसचा सत्ताधारी भाजपवर कडाडून हल्ला; विरोधकांच्या आरोपांना भाजपचे सडेतोड प्रत्युत्तरपिंपरी-चिंचवड मनपाच्या शहर अभियंतापदी नियुक्ती झाल्याबद्दल मनोज सेठीयांचा स्थायी समितीच्या सभेत विशेष नागरी सत्कारशुद्ध पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, आरोग्य सेवांसह मोरवाडी व कासारवाडीत युवकांसाठी जपानी अन् जर्मन भाषा अभ्यासक्रम सुरू करण्याचा क्रांतिकारी निर्णयउप आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेकडून विशेष जनजागृती अभियान; आपत्कालीन मदतीसाठी १०१ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनशालेय बसच्या नियमित तांत्रिक तपासणी, देखभाल आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड मनपाच्या शहर अभियंतापदी नियुक्ती झाल्याबद्दल मनोज सेठीयांचा स्थायी समितीच्या सभेत विशेष नागरी सत्कार

पिंपरी-चिंचवड मनपाच्या शहर अभियंतापदी नियुक्ती झाल्याबद्दल मनोज सेठीयांचा स्थायी समितीच्या सभेत विशेष नागरी सत्कार

मनोज सेठीया यांच्या नियुक्तीने पिंपरी-चिंचवडच्या विकासाला नवी दिशा; सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते सत्कार | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मनोज सेठीयांसारख्या अनुभवी अधिकाऱ्यामुळे शहराच्या विकासाला अधिक गती अन् पारदर्शकता येईल; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचा विश्वास!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: “पिंपरी-चिंचवड शहर हे देशपातळीवर अत्यंत वेगाने विकसित होणारे प्रगत शहर आहे. शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेता पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार आणि वेळेत होणे गरजेचे आहे. मनोज सेठीया यांच्यासारखा दांडगा तांत्रिक अनुभव आणि कामाचा उरक असलेला कर्तबगार अधिकारी शहर अभियंता पदी आल्यामुळे नक्कीच पिंपरी-चिंचवडच्या विकासाच्या प्रत्येक कामाला अधिक गती आणि पारदर्शकता लाभेल,” अशा शब्दांत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी नवनिर्वाचित शहर अभियंता मनोज सेठीया यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शहर अभियंता पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मनोज सेठीया यांचा स्थायी समितीच्या वतीने सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते सस्नेह सत्कार करण्यात आला.

सतत लोकहिताचे आणि दूरदृष्टीचे निर्णय घेऊन पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी नेहमीच कार्यक्षम आणि पारदर्शक प्रशासनावर भर दिला आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेली विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि प्रत्येक नागरिकाला दर्जेदार नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी सभापती बारणे प्रशासकीय यंत्रणेला सतत प्रोत्साहित करत असतात.
सत्कारप्रसंगी बोलताना अभिषेक बारणे म्हणाले, “सेठीया यांनी आपल्या सेवाकाळात नेहमीच प्रशासकीय शिस्त आणि कामाचा वेग कायम ठेवला आहे. महापालिकेच्या माध्यमातून ज्या विविध महत्त्वाकांक्षी विकासप्रकल्पांचे नियोजन सुरू आहे, त्यांना प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्याचे मोठे आव्हान या विभागावर असते. सेठीया यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी विभाग अधिक जोमाने काम करेल आणि शहरातील प्रत्येक नागरिकाला उत्तम सुविधा मिळवून देण्याच्या आमच्या स्वप्नाला आणखी बळ मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”

सभापती अभिषेक बारणे आणि स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नवनियुक्त शहर अभियंता मनोज सेठीया म्हणाले, “पदाधिकारी व प्रशासनाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, ती मी पूर्ण निष्ठा, प्रामाणिकपणा आणि अचूक वेळेत पार पाडेन. शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा देणे आणि प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावणे हेच माझे मुख्य ध्येय असेल.”
या प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश जंगम, तृप्ती सांडभोर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थायी समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!