news
Home पिंपरी चिंचवड वाचनातून घडणारी विचारशील पिढीच समाजाचे उज्ज्वल भविष्य; रावेतमध्ये उपमहापौर शर्मिला बाबर यांचे प्रतिपादन!

वाचनातून घडणारी विचारशील पिढीच समाजाचे उज्ज्वल भविष्य; रावेतमध्ये उपमहापौर शर्मिला बाबर यांचे प्रतिपादन!

सहगामी फाउंडेशन आणि शाळा प्रशासनाच्या उपस्थितीत वाचन प्रेरणा उपक्रम संपन्न; शिक्षकांनी मानले उपमहापौरांचे आभार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पुस्तकांशी मैत्री विद्यार्थ्यांच्या विकासाची गुरुकिल्ली: उपमहापौर शर्मिला बाबर

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ अभ्यासक्रमातील ज्ञानासोबतच अवांतर वाचनाची सवयही तितकीच महत्त्वाची आहे. पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि त्यांना नवी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना विविध विषयांचे अवांतर ज्ञान मिळावे आणि वाचनसंस्कृतीच्या माध्यमातून त्यांच्या विचारशक्तीला नवी दिशा मिळावी, या सामाजिक उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रावेत येथील प्राथमिक/माध्यमिक शाळेच्या वाचनालयासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या वतीने विविध विषयांच्या दर्जेदार पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

उपक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या,  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणासोबतच वाचनसंस्कृती रुजणे अत्यंत गरजेचे आहे. पुस्तकांमधून केवळ नवे ज्ञान मिळत नाही, तर कल्पनाशक्तीला चालना मिळून व्यक्तिमत्त्व समृद्ध होते.   महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी दर्जेदार पुस्तके सहज उपलब्ध व्हावीत आणि त्यांची पुस्तकांशी मैत्री दृढ व्हावी, याच उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.  वाचनातून घडणारी विचारशील आणि जिज्ञासू पिढीच आगामी काळात देशाच्या व समाजाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करेल.

या पुस्तकांचे वाटप आणि वाचन प्रेरणा कार्यक्रमाप्रसंगी सहगामी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राजक्ता रुद्रवाड आणि रावेत शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री जाधव यांच्यासह सहशिक्षक समुद्र शर्मिला, चारुशीला जाधव, अर्चना ओहोळ, वर्षा गुंजाळ, पांडुरंग घुगे, सोनाली डूमणे, शशिकांत चौधरी, प्रियांका भानगडे, भाकेश्वर दांडगे आणि शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या या उपक्रमाचे मनापासून आभार मानत, या पुस्तकांमुळे शाळेतील वाचनालय अधिक समृद्ध होईल आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!