news
नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता हेच प्रथम कर्तव्य! रहाटणीत डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाबासाहेब त्रिभुवन ॲक्शन मोडमध्ये!नाव मतदार यादीतून पूर्णपणे वगळलेले नाही; दाव्यांच्या कालावधीत ‘फॉर्म ६’ भरून नोंदणीची पुन्हा संधी!वेफर्स, चिप्स अन् शीतपेयांची शाळांच्या प्रवेशद्वाराजवळ उघड विक्री; पिंपरी-चिंचवडमध्ये सरकारी नियमांचे पार वाजले तीन तेरा!एमआयडीसी आणि मनपाच्या ‘फुटबॉल’ कारभाराला उद्योजक कंटाळले; सर्व नागरी सुविधा एकाच प्राधिकरणाकडे देण्याची मागणी!विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कौटुंबिक स्नेह मेळावा उत्साहात; आमदारांसह लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती!
Home पिंपरी चिंचवड कर्तव्यनिष्ठा आणि समर्पित भावनेने काम करा; विशेष शाखा कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे आवाहन!

कर्तव्यनिष्ठा आणि समर्पित भावनेने काम करा; विशेष शाखा कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे आवाहन!

गोपनीय व प्रशासकीय कामकाजाला मिळणार गती; पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात भव्य सोहळा संपन्न | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात विशेष शाखा कार्यालयाचे थाटात उद्घाटन; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते झाले अनावरण

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यक्षमतेला नवी गती देण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा यांच्या स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या हस्ते फीत कापून व नामफलकाचे अनावरण करून या कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उप-आयुक्त (विशेष शाखा) म्हणून श्री. धीरज पाटील यांची दि. २७ मे २०२६ रोजी नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या दैनंदिन व प्रशासकीय कामकाजाच्या सुलभतेसाठी पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार हे स्वतंत्र कार्यालय उभारण्यात आले आहे.

उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी सांगितले की  नवीन स्वतंत्र कार्यालयामुळे विशेष शाखेकडील विविध प्रशासकीय, गोपनीय व नागरिकांशी संबंधित कामकाज अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगाने होण्यास मदत होईल. पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठा, कार्यक्षमता आणि समर्पित भावनेने आपले कर्तव्य बजावले पाहिजे.

या उद्घाटन सोहळ्यास पिंपरी चिंचवड पोलीस दलातील सर्व प्रमुख व वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड (गुन्हे), डॉ. बसवराज तेली (प्रादेशिक विभाग), पोलीस उप-आयुक्त श्री. धीरज पाटील (विशेष शाखा), श्री. रोहिदास पवार (गुन्हे शाखा), श्री. गणेश इंगळे (मुख्यालय), श्री. संदीप आटोळे (झोन १), श्री. प्रदीप जाधव (झोन २), श्री. मारुती जगताप (झोन ३), श्री. विक्रांत देशमुख (वाहतूक शाखा),  सहायक पोलीस आयुक्त श्री. सुनील पंधरकर (विशेष शाखा), श्री. रणजीत पाटील (प्रशासन), श्री. सुदर्शन राठोड (गुन्हे-१), श्री. सचिन कदम (गुन्हे-२), श्री. सुधाकर यादव (एमआयडीसी भोसरी विभाग), श्रीमती रोहिणी बाणकर (सायबर / आर्थिक गुन्हे शाखा),  वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंत कदम (विशेष शाखा-१), श्री. संजय नरावाड (विशेष शाखा-२) या कार्यक्रमास विशेष शाखा-१ व विशेष शाखा-२ कडील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!