news
नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता हेच प्रथम कर्तव्य! रहाटणीत डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाबासाहेब त्रिभुवन ॲक्शन मोडमध्ये!नाव मतदार यादीतून पूर्णपणे वगळलेले नाही; दाव्यांच्या कालावधीत ‘फॉर्म ६’ भरून नोंदणीची पुन्हा संधी!वेफर्स, चिप्स अन् शीतपेयांची शाळांच्या प्रवेशद्वाराजवळ उघड विक्री; पिंपरी-चिंचवडमध्ये सरकारी नियमांचे पार वाजले तीन तेरा!एमआयडीसी आणि मनपाच्या ‘फुटबॉल’ कारभाराला उद्योजक कंटाळले; सर्व नागरी सुविधा एकाच प्राधिकरणाकडे देण्याची मागणी!विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कौटुंबिक स्नेह मेळावा उत्साहात; आमदारांसह लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती!
Home पिंपरी चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कौटुंबिक स्नेह मेळावा उत्साहात; आमदारांसह लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती!

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कौटुंबिक स्नेह मेळावा उत्साहात; आमदारांसह लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती!

पश्चिम महाराष्ट्र युवामंचाचा स्तुत्य उपक्रम; निगडीतील यशवंतराव चव्हाण स्मृती भवनात रंगला सत्कार सोहळा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

निगडीतील यशवंतराव चव्हाण स्मृती भवनात सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर मित्र मंडळाचा भव्य स्नेह मेळावा संपन्न

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

निगडी: पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना एकत्र आणण्यासाठी निगडी येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती भवन येथे ‘सातारा-कोल्हापूर-सांगली-सोलापूर जिल्हा मित्र मंडळ’ आणि ‘पश्चिम महाराष्ट्र युवामंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य “सत्कार सोहळा व कौटुंबिक स्नेह मेळावा” उत्साहात पार पडला. निगडीतील हे सभागृह पिंपरी-चिंचवडमध्ये वसलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील हजारो नागरिकांसाठी हक्काचे सांस्कृतिक व सामाजिक केंद्र ठरत आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष मा. ना. अण्णा बनसोडे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या कौटुंबिक स्नेह मेळाव्यास राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक वरिष्ठ नेत्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आमदार शशिकांत शिंदे, आमदार शंकरशेठ जगताप,आमदार मनोजदादा घोरपडे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, आमदार सौ. उमाताई खापरे, आ. अमित गोरखे,  महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर,  अनुप मोरे यांच्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील नागरिक आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना वक्त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा असा पाठीवर थाप मारून केलेला सन्मान त्यांच्या कष्टाला दिलेली प्रेरणादायी दाद आहे. वाचनालय आणि विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी निगडी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती भवन हे नागरिकांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचे मुख्य केंद्र बनले आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांतील पुरस्कारार्थी आणि भव्य सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र युवामंचाचे उपस्थितांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!