38
चिंचवडकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक अनंता कोऱ्हाळे मैदानात; प्रभागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरले!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. २६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: जनसामान्यांच्या अडीअडचणींना नेहमीच प्राथमिकता देऊन त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर तत्परतेने धावून जाणारे लोकप्रिय आणि धडाडीचे नगरसेवक अनंता कोऱ्हाळे यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे. प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते थेट जनमानसात उतरले असून, त्यांच्या या तडफदार आणि संवेदनशील कार्यशैलीमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांच्याबद्दल अत्यंत आदरयुक्त आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकतेच चिंचवडमधील कुणाल इस्टेट, गुलमोहर कॉलनी व धीरज पार्क परिसराचा दौरा करून नगरसेवक अनंता कोऱ्हाळे यांनी स्थानिक नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी नागरिकांनी त्यांच्यासमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्याशी संबंधित समस्या, रस्त्यांची दुर्दशा आणि परिसरातील धोकादायक वाढलेली झाडे यांसारख्या अनेक गंभीर अडचणींचा पाढा वाचला.
नागरिकांची ही आहोरात्र भेडसावणारी समस्या गांभीर्याने घेत, अनंता कोऱ्हाळे यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेत दर्जेदार व वेळेत काम करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या या आक्रमक आणि पाठपुरावा करणाऱ्या भूमिकेमुळे तातडीने प्रभागात प्रशासकीय कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे.
नगरसेवक अनंता कोऱ्हाळे यांच्या या धडाडीच्या भूमिकेमुळे आणि लोकांशी थेट संवाद साधून प्रश्न मार्गी लावण्याच्या सवयीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड समाधान व्यक्त होत आहे.
“आमच्या प्रभागात अनेक दिवसांपासून पाण्याचा आणि रस्त्यांचा प्रश्न होता, तसेच धोकादायक झाडांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, नगरसेवक अनंता कोऱ्हाळे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून अवघ्या काही दिवसांत अधिकाऱ्यांकडून कामे मार्गी लावली. ते केवळ एक नगरसेवक नसून आमच्या सुख-दुःखात कायम पाठीशी उभे राहणारे एक उत्तम आणि सच्चे समाजसेवक आहेत,” अशा शब्दांत स्थानिक रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शहराच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटणारे नगरसेवक अनंता कोऱ्हाळे हे खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून चिंचवड परिसरात ओळखले जात आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

