news
Home पिंपरी चिंचवड संत नरहरी महाराजांचे चरित्र अत्यंत प्रेरणादायी; ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज यांचे सांगवीत भावस्पर्शी निरूपण!

संत नरहरी महाराजांचे चरित्र अत्यंत प्रेरणादायी; ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज यांचे सांगवीत भावस्पर्शी निरूपण!

जयंती व अभीष्टचिंतन सोहळ्याने सांगवीत भक्तिमय वातावरण; सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सांगवी विकास मंचच्या वतीने संतश्रेष्ठ नरहरी सोनार महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी सुनील पोखरे, दि. २६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

सांगवी: सांगवी विकास मंचच्या वतीने संतश्रेष्ठ श्री नरहरी सोनार महाराज यांची जयंती काल, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी सांगवी परिसरातील मोठ्या संख्येने भाविक आणि समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून यथोचित पूजा करण्यात आली. सुवर्णकार समाजाचे ज्येष्ठ नेते दिलीपकुमार फाकटकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.

कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ज्येष्ठ प्रवचनकार ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज यांनी संत नरहरी सोनार महाराज यांचे चरित्र अत्यंत भावस्पर्शी शब्दांत मांडले. त्यांनी महाराजांच्या जीवनप्रवाहातील अनेक मौलिक प्रसंगांचे दाखले देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास जोडूनच वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्य अतिथी ह.भ.प. बाळासाहेब शितोळे, अशोकराव भोसले, महेशशेठ भागवत, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जमाले आणि साहित्यिक मुरलीधरपंत दळवी यांनी ह.भ.प. वाघ महाराज यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

ह.भ.प. वाघ महाराज यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याबद्दल अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ सांगवी परिसराचे भूतपूर्व अध्यक्ष अशोकराव भोसले, ह.भ.प. बाळासाहेब शितोळे, खादी ग्रामोद्योग समूहाचे माजी संचालक सुनील पोकरे, ज्येष्ठ उद्योजक भरतशेठ कुंभार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड, बाळकृष्ण गिरगुणे, संत साहित्याचे अभ्यासक जयप्रकाश नारायण खोत आणि ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडोपंत शेळके यांचा समावेश होता.
या सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जमाले, रामचंद्र सपकाळ, माजी पोलीस अधिकारी सुनील कदम, मदन चांदेकर, अरुण लांडे, विश्वनाथ हिरेमठ, विनायक अल्हाट, कृष्णकांत गिरगुणे, भरतशेठ कुंभार, मुरलीधर दळवी, राजेंद्र लक्ष्मन कोल्लम, संजय तरटे, अशोक बेल्हेकर, दत्तात्रेय राऊत, दत्तात्रेय पवार, विजयकुमार मोहिते, अशोक जमाले, प्रदीप देशमुख, अरुण खटावकर, लक्ष्मीकुमार माळवदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सांगवी विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष महेशशेठ भागवत यांनी केले. शेवटी दिलीपकुमार फाकटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!