31
स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या कार्यकुशलतेचा प्रत्यय! पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. २६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी स्थायी समितीचा कार्यभार स्वीकारल्यापासून सातत्याने जनहित आणि शहराच्या पायाभूत विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यांच्याच दूरदर्शी व धडाडीच्या नेतृत्वाखाली काल, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत शहराच्या विकासाला नवी गती देणाऱ्या, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडवणाऱ्या आणि आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
अभिषेक बारणे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे पुनावळे, चिंचवड, चिखलीसह संपूर्ण शहरातील नागरी सुविधांचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे.
पुनावळे बी.आर.टी.एस. रोडपासून पुनावळे अंडरपासपर्यंत १८ मीटर रुंद रस्ता विकसित करणे, तसेच पावसाळी पाण्याचा पाण्याचा निचरा करण्यासाठी जलनिस्सारण वाहिन्या उभारण्याच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. चिंचवड मतदारसंघातील विशालनगर, पिंपळे निलख येथील गणपती चौक ते छत्रपती बँक ते साईश्री कॉलनी या १२ मीटर रुंद रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला मंजुरी. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (YCMH) सर्जरी विभागासाठी ‘निगेटिव्ह प्रेशर ऊंड थेरपी’ मशीनकरिता आवश्यक साहित्याची खरेदी, तसेच पदव्युत्तर पदवी संस्थेसाठी विविध वैद्यकीय साहित्याच्या खरेदीस मंजुरी. महापालिकेच्या १६ माध्यमिक विद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात ‘एज्युराईज (न्यूजपेपर इन एज्युकेशन)’ उपक्रमांतर्गत साप्ताहिक अंक उपलब्ध करून देण्यास मान्यता. महापालिकेच्या ३ हजार संगणकांसाठी अँटी-व्हायरस खरेदी व ३ वर्षांसाठी सपोर्ट स्टाफ नियुक्ती, तसेच प्रभाग क्र. २ चिखली परिसरातील महापालिका इमारतींच्या दुरुस्ती कामांना मंजुरी.
“स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आलेले सर्व प्रस्ताव शहराच्या भविष्यासाठी आणि नागरी हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते व जलनिस्सारणाची कामे, वैद्यकीय सुविधांमधील आधुनिक सुधारणा आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यावर आम्ही भर दिला आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक नागरिकाला सक्षम व दर्जेदार नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विकासकामांना सातत्याने प्राधान्य दिले जाईल.”— अभिषेक बारणे (सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड मनपा)
सभापती अभिषेक बारणे यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या थेट प्रश्नांना प्रशासकीय मंजुरी मिळवून देण्याच्या तडफेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात त्यांची एक संवेदनशील व धडाडीचे लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम प्रतिमा निर्माण झाली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
