news
Home पिंपरी चिंचवड जिद्द अन् कठोर मेहनतीच्या जोरावर कु. संस्कार शिंदे चमकला; जिलास्तरीय कराटे स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक!

जिद्द अन् कठोर मेहनतीच्या जोरावर कु. संस्कार शिंदे चमकला; जिलास्तरीय कराटे स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक!

प्रशिक्षक आशिष तिकोने यांच्या मार्गदर्शनाला यश; पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा जगतात संस्कारच्या कामगिरीची चर्चा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडचा सुपुत्र कु. संस्कार संतोष शिंदे कराटे स्पर्धेत चॅम्पियन; सुवर्णपदक पटकावत शहराच्या नावाचा केला लौकिक!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: शहरातील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात नुकतीच ‘जिल्हास्तरीय कराटे कमिट चॅम्पियनशिप-२०२६’ अत्यंत उत्साहात पार पडली. युनिव्हर्सल शोटोकन कराटे दो असोसिएशनच्या वतीने आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील शेकडो होतकरू खेळाडूंनी सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. या अटीतटीच्या स्पर्धेत नामांकित वकील तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी ॲड. संतोष शिंदे आणि कुलस्वामिनी महिला व बालकल्याण महासंघाच्या अध्यक्षा सौ. शितल शिंदे यांचे सुपुत्र कु. संस्कार संतोष शिंदे याने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील क्रीडाप्रेमींचे श्रद्धास्थान असलेल्या मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत विविध वयोगटांतील शेकडो खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कराटे खेळाच्या विविध प्रकारांत खेळाडूंमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली.  कठोर मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ट तंत्राच्या जोरावर कु. संस्कार शिंदे याने अंतिम फेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्याच्या या यशाने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. कु. संस्कार शिंदे याच्या या यशामध्ये त्याचे मार्गदर्शक प्रशिक्षक मा. आशिष तिकोने यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच, सहकारी आणि कुटुंबीयांच्या सततच्या पाठबळामुळेच हे यश संपादन करणे शक्य झाल्याचे त्याने सांगितले.

कु. संस्कार शिंदे याने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्रीडा क्षेत्रासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी ॲड. संतोष शिंदे आणि सौ. शितल शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन कु. संस्कार याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. या उज्ज्वल यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, भविष्यात तो देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!