6
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात पुराचा हाहाकार; ३८४ पर्यटक बेपत्ता, अडकलेल्या नागरिकांसाठी आपत्कालीन मदत व हेल्पलाईन जाहीर
पुणे / पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यातील भोटे कोशी नदीला (Bhote Koshi River) अचानक आलेल्या भीषण पुरामुळे (Flash Flood) मोठा हाहाकार उडाला असून तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत विविध देशांतील व भारतासह महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले आहेत.
नेपाळ पर्यटन बोर्डाने (Nepal Tourism Board) दिलेल्या अधिकृत प्राथमिक माहितीनुसार, या पुरामुळे विविध ट्रॅव्हल एजन्सींमार्फत प्रवास करणारे एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता (Missing) असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये २९१ परदेशी पर्यटक आणि ९३ नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. या परदेशी पर्यटकांमध्ये भारतीय नागरिकांसह (India / NRI), अमेरिका, ब्रिटन, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व नीदरलँड या देशांतील पर्यटकांचा समावेश आहे.
नेपाळ पर्यटन बोर्डाची अधिकृत आकडेवारी व एजन्सीनिहाय तक्ता:
| ट्रॅव्हल / टुरिझम एजन्सी | एकूण पर्यटक | परदेशी नागरिक (Foreign Nationals) | नेपाळी नागरिक |
| सम्राट टुअर्स अँड ट्रॅव्हल्स | ७१ | ५९ (भारत) | १२ |
| काठमांडू हॉलिडे टुअर्स | १७ | २ (१ ऑस्ट्रेलिया, १ नीदरलँड) | १५ |
| लीफ हॉलिडे | ५५ | ४६ (भारत) | ९ |
| कैलास जर्नी | ३१ | २६ (राष्ट्रीयत्व पडताळणी सुरू) | ५ |
| एक्सप्लोर व्हॅकेशन | ७ | — | ७ |
| ट्रेकर्स सोसायटी | ९२ | ७७ (राष्ट्रीयत्व पडताळणी सुरू) | १५ |
| रिचा टुअर्स अँड ट्रॅव्हल्स | १२ | ८ (राष्ट्रीयत्व पडताळणी सुरू) | ४ |
| फिशटेल टुअर्स अँड ट्रॅव्हल्स | २७ | २० (३ अमेरिका, १७ मलेशिया) | ७ |
| हिमालयन ग्लेशियर | ५२ | ३७ (अनिवासी भारतीय / NRI) | १५ |
| अल्पाबाईन इको ट्रेक | २० | १६ (१२ यूके, ४ दक्षिण आफ्रिका) | ४ |
| एकूण | ३८४ | २९१ | ९३ |
नेपाळ पर्यटन बोर्डाचे आपत्कालीन मदत क्रमांक (Emergency Assistance):
• टोल-फ्री नंबर: १२३४
• हॉटलाईन नंबर: ११४४
• टुरिस्ट पोलीस (Tourist Police): +९७७-९८५१२८९४४५
• ईमेल: info@ntb.org.np
महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (मंत्रालय, मुंबई) नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी विशेष ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.
🔗 माहिती नोंदवण्यासाठी ऑनलाइन लिंक:
नेपाळमध्ये पुणे जिल्ह्यातील किंवा पिंपरी-चिंचवड परिसरातील कोणतेही नागरिक वा पर्यटक अडकले असल्यास, त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ वरील लिंकवर जाऊन माहिती नोंदवावी, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे.
जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष (जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे):
• दूरध्वनी क्रमांक: ०२०-२६१२३३७१
• टोल फ्री हेल्पलाईन: १०७७
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
