news
पुण्यात जमिनीच्या व्यवहारात फसवणूक; रुपाली चाकणकरांचे दीर विक्रम चाकणकर यांच्यावर नांदेड सिटी पोलिसांत गुन्हा!‘एक झाड म्हणजे भविष्यातील श्वासाची हमी’; जांबवडे येथे ‘वनश्री’ पुरस्कारप्राप्त अरुण पवार यांचे नागरिकांना आवाहन!‘सरकारी नोकरीच्या खोट्या आमिषांना बळी पडू नका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे नागरिकांना आवाहन, भामट्यावर गुन्हा दाखल!‘साक्षीदारांची सुरक्षा धोक्यात; धमकावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा’; किशोर आवारे खटल्यातील प्रत्यक्षदर्शींची ठाम मागणी!‘नागरिकांना त्रास न होता पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाने कचऱ्याची विल्हेवाट लावणार’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड ‘एक झाड म्हणजे भविष्यातील श्वासाची हमी’; जांबवडे येथे ‘वनश्री’ पुरस्कारप्राप्त अरुण पवार यांचे नागरिकांना आवाहन!

‘एक झाड म्हणजे भविष्यातील श्वासाची हमी’; जांबवडे येथे ‘वनश्री’ पुरस्कारप्राप्त अरुण पवार यांचे नागरिकांना आवाहन!

भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने १ हजार रोपांचे वृक्षारोपण; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मराठवाडा जनविकास संघाचा स्तुत्य उपक्रम; ‘वृक्ष मित्र’ अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली भंडारा डोंगराच्या पायथ्याशी १ हजार रोपांचे भव्य वृक्षारोपण!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी / जांबवडे: निसर्गाचा समतोल राखणे, वाढते प्रदूषण रोखणे आणि भावी पिढीसाठी हिरवेगार व सुरक्षित भविष्य निर्माण करण्याच्या उदात्त ध्येयातून मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने जांबवडे येथील पवित्र भंडारा डोंगराच्या पायथ्याशी १ हजार रोपांचे भव्य वृक्षारोपण करण्यात आले. “एक झाड म्हणजे केवळ हिरवाई नव्हे, तर ती भविष्यातील श्वासाची हमी आहे,” या भावनेतून शेकडो पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचा ठाम संकल्प केला.

आपल्या सामाजिक आणि पर्यावरणपूरक कार्यातून जनमानसात वेगळी ओळख निर्माण करणारे, महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारा’ने सन्मानित तसेच ‘समाजभूषण’ ‘वृक्ष मित्र’ अरुण पवार यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले. निसर्ग संवर्धनासाठी सातत्याने अहोरात्र धडपडणाऱ्या अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा जनविकास संघाने सामाजिक बांधिलकीचा एक नवीन वस्तुपाठ घालून दिला आहे.
या वेळी बोलताना अरुण पवार म्हणाले, “वृक्ष हे निसर्गाने मानवाला दिलेले प्राणवायूचे अमूल्य साधन आहे. आज जर आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व संवर्धन केले नाही, तर भविष्यात मानवजातीसमोर पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. झाड लावणे जितके गरजेचे आहे, तितकेच ते मातृभावाने जगवणे आणि वाढवणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.”

या उपक्रमात जगन्नाथ नाटक पाटील यांनी पर्यावरण संवर्धनासाठी समाजाने एकत्र येण्याचे आवाहन करत हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता वर्षभर काळजी घेण्याचे स्पष्ट केले. डॉ. भारतीताई चव्हाण यांनी सामाजिक संस्थांच्या एकत्र येण्याला काळाची गरज म्हटले, तर तानाजी नाटक यांनी सामाजिक सहभागातून वृक्षारोपणाची चळवळ घराघरांत पोहोचवण्याचा संदेश दिला.
हा भव्य उपक्रम श्री संत तुकाराम महाराज विठ्ठल-रखुमाई भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट, मराठवाडा जनविकास संघ, गुणवंत कामगार कल्याण मंडळ, नवचैतन्य हास्ययोग परिवार, भारतीय योग संस्थान, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, जनकल्याण प्रतिष्ठान, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघ आणि ‘अ रे ऑफ होप चॅरिटेबल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.

या कार्यक्रमास देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद पाटील, इंदोरीचे सरपंच शशिकांत शिंदे, जांबवडेचे सरपंच तानाजी नाटक, पंचायत समिती सदस्य गटनेते दिलीप नामदेव ढोरे, देवस्थानचे सचिव जोपाशेठ पवार, माजी चेअरमन अरविंद शेवकर, ह.भ.प. रामभाऊ कराळे, वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदेमल्लीनाथ हिरेमठ, ह.भ.प. बाळकृष्ण भोरकडे, नियत क्षेत्र वन अधिकारी मंगल बबन दाते/ढोरे, वनाधिकारी रमेश ठोंबरे, बाळासाहेब साळुंके, मोहम्मदशरीफ मुलानी, डॉ. नंदकुमार धुमाळ, दिनेश पवार, पांडुरंग सुतार, शंकरराव सावंत, शिवाजी साळुंखे, प्रकाश इंगोले, महादेव स्वामी, किशोर अट्टरगेकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!