news
‘सेंट्री चाळीतील गरिबांवरील अन्याय सहन करणार नाही’; वाकडकर असोसिएटच्या SRA प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी!वाहतूक क्षेत्रातील आघाडीच्या ‘CIRT’ संस्थेचे ६० व्या वर्षात पदार्पण; हीरक महोत्सवी वर्षात राष्ट्रीय कार्यशाळांचे आयोजन!पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध गुन्ह्यांची नोंद; किवळे येथे भीषण अपघातात एकाचा मृत्यू!सीसीटीव्ही अन् गुप्त बातमीदाराच्या जाळ्यात अडकला घरफोड्या; शेलपिंपळगाव चोरी प्रकरणी अहिल्यानगर येथून आरोपी जेरबंद!ग्रामीण भागात सीसीटीव्ही नसताना पिंपरी पोलिसांचा दिल्लीपर्यंत माग; २ हजार रुपयांच्या वादातून झालेल्या खुनाचा पर्दाफाश!
Home पिंपरी चिंचवड ‘जागतिक तंत्रज्ञानात नेतृत्वासाठी विद्यार्थ्यांनी जिज्ञासा अन् अभ्यासू वृत्ती जपावी’; पीसीयूच्या दीक्षारंभ सोहळ्यात तज्ज्ञांचे आवाहन!

‘जागतिक तंत्रज्ञानात नेतृत्वासाठी विद्यार्थ्यांनी जिज्ञासा अन् अभ्यासू वृत्ती जपावी’; पीसीयूच्या दीक्षारंभ सोहळ्यात तज्ज्ञांचे आवाहन!

अक्कॉप्स सिस्टीम्स आणि स्केल्ड एजिलच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती; उद्योगभिमुख कौशल्यांवर भर देण्याचा सल्ला | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड विद्यापीठात (PCU) स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सचा दीक्षारंभ; कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील बदल व आव्हानांवर तज्ज्ञांची चर्चा!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १६ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी / साते (मावळ): कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात होत असलेल्या जलद बदलांवर चिकित्सक पद्धतीने लक्ष ठेवून विद्यार्थ्यांनी सातत्याने जिज्ञासा जपली पाहिजे, नवकल्पनांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सातत्याने अभ्यास केला पाहिजे. भारताला जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात नेतृत्व करण्याची मोठी संधी उपलब्ध असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारणे काळाची गरज आहे, असे ठाम प्रतिपादन क्रिस्टा चे सीनियर डायरेक्टर ऑफ इंजिनिअरिंग दीपक शिंगण यांनी केले.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) साते (ता. मावळ) येथील पिंपरी-चिंचवड विद्यापीठात (PCU) स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ’ (Induction Program) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या दीक्षारंभ सोहळ्यात उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
भविष्यातील डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी भारतासाठी स्वदेशी सायबर सुरक्षा उपाय विकसित करण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी मजबूत प्रोग्रामिंग कौशल्ये, मूलभूत संकल्पनांवर प्रभुत्व आणि समस्यांकडे जिज्ञासूपणे पाहण्याची वृत्ती विकसित करावी, असा सल्ला त्यांनी दिला. – विजेंद्र यादव (सह-संस्थापक, अक्कॉप्स सिस्टीम्स)

तांत्रिक कौशल्यांसोबतच सातत्याने शिकणे, आवश्यकतेनुसार जुन्या पद्धती विसरून नव्या पद्धती स्वीकारणे (Learn, Unlearn and Re-learn) हीच यशस्वी व्यावसायिकाची ओळख असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी बदलांसाठी सदैव तयार राहावे, असे आवाहन केले. – डॉ. महेंद्र रामदासी (सीनियर व्हाइस प्रेसिडेंट, स्केल्ड एजिल ट्रान्सफॉर्मेशन)

 

पीसीईटीच्या ३५ वर्षांहून अधिक शैक्षणिक परंपरेचा उल्लेख करत, उद्योगभिमुख अभ्यासक्रम, जपानी व कोरियन उद्योगांसोबतचे सहकार्य आणि कौशल्याधारित शिक्षणाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःला जागतिक पातळीवर सक्षम बनवावे, असे सांगितले. – डॉ. संतोष सोनवणे (कुलगुरू, PCU)

 

हॅकेथॉन, क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा सायन्स व उद्योगमान्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा लाभ घेत यशस्वी करिअर घडवण्याचे आवाहन त्यांनी केले. – डॉ. कमलेश मेश्राम (प्रमुख, स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स)

 

या प्रसंगी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम पीसीईटीचे विश्वस्त व कुलपती हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात पार पडला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!