news
पिंपरी-चिंचवड पोलिसांची बेकायदेशीर नागरिकांवर धडक कारवाई; आतापर्यंत २६ बांगलादेशी नागरिकांना केले डिपोर्ट!नोकरीच्या मागे न धावता स्व-उद्योग! रावेतातील ‘कॅफे अरोमा’ तरुणाईच्या भेटीस सज्ज; आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते शुभारंभ!पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘बालस्नेही शहर’ निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल; शहरात धावणार विशेष “चाईल्ड फ्रेंडली बस”!‘स्व-निर्णयक्षमतेतूनच आत्मविश्वास वृद्धिंगत होतो’; PCCOE च्या स्वागत समारंभात संचालक डॉ. गोविंद कुलकर्णींचे प्रतिपादन!‘वैधानिक समित्यांचे अधिकार पायदळी तुडवल्याचा आरोप’; पिंपरी महापालिकेत पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्याविरोधात असंतोषाचा उद्रेक!
Home पिंपरी चिंचवड ‘स्व-निर्णयक्षमतेतूनच आत्मविश्वास वृद्धिंगत होतो’; PCCOE च्या स्वागत समारंभात संचालक डॉ. गोविंद कुलकर्णींचे प्रतिपादन!

‘स्व-निर्णयक्षमतेतूनच आत्मविश्वास वृद्धिंगत होतो’; PCCOE च्या स्वागत समारंभात संचालक डॉ. गोविंद कुलकर्णींचे प्रतिपादन!

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अन् पालक सभा संपन्न; पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

व्यक्तिमत्त्व विकासासाठी संवाद कौशल्य वाढवावे: डॉ. गोविंद कुलकर्णी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

आकुर्डी, पिंपरी: “महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे. आपल्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी संवाद कौशल्य (Communication Skills) सातत्याने वाढवावे. स्व-निर्णयक्षमता विकसित झाली की आपोआप आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. महाविद्यालयाच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या विविध संधींचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग करावा आणि आपले उज्ज्वल करिअर घडवावे,” असे मौलिक मार्गदर्शन पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे (PCCOE) संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) आकुर्डी येथील ‘पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ (PCCOE) मध्ये प्रथम वर्ष बी.टेक (शैक्षणिक वर्ष २०२६-२७) च्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. त्यावेळी डॉ. कुलकर्णी बोलत होते.

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “सध्या जगभरात सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ची (AI) मोठी चर्चा आहे. एआयमुळे भविष्यात गुंतवणूक आणि रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण होणार आहेत. मात्र, या संधींचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम उच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य (Technical Skills) प्राप्त करून स्वतःला सक्षम केले पाहिजे. पीसीईटी अंतर्गत असणारी महाविद्यालये यासाठी परिपूर्ण आहेत, मात्र यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःचे योगदान देणे तितकेच आवश्यक आहे.”
या प्रसंगी डॉ. संदीप पाटील आणि डॉ. अश्विनी वझे यांनी विद्यार्थी व पालकांना विद्यार्थी सक्षमीकरण, वैयक्तिक विकास, शैक्षणिक उत्कृष्टता आणि जबाबदार नागरिकत्व यांविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून विकासाची जबाबदारी घ्यावी आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

समारोपाच्या सत्रात महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ‘पालक सभा’ घेण्यात आली. या सभेच्या माध्यमातून पीसीसीओईमधील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थी साहाय्य प्रणाली आणि उपलब्ध संधींबद्दल पालकांशी सविस्तर संवाद साधण्यात आला.

या स्वागत सोहळ्यास पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. के. राजेश्वरी, डीन डॉ. पी. ए. देशमुख, डॉ. रजनी पी. के., डॉ. एस. व्ही. शिंदे, डॉ. एस. एस. सोनार, डॉ. नरेंद्र देवरे, डॉ. महेश कोलते, डॉ. वर्षा हरपाळे, डॉ. एस. यू. भंडारी, डॉ. रोशनी राऊत, विभाग प्रमुख डॉ. सोनाली पाटील, डॉ. एस. एस. सांबरे, डॉ. ए. डी. ठाकरे, डॉ. अश्विनी वझे, डॉ. जे. व्ही. कट्टी, डॉ. ए. के. गायकवाड, डॉ. एस. बी. माटेकर, डॉ. पी. आर. काळे, शैक्षणिक व सामाजिक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. लीना शर्मा यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. लीना शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता पेंडमप्रा. रेदिका जॉर्ज यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. अंजली साकुरकर यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!