news
पिंपरी-चिंचवड पोलिसांची बेकायदेशीर नागरिकांवर धडक कारवाई; आतापर्यंत २६ बांगलादेशी नागरिकांना केले डिपोर्ट!नोकरीच्या मागे न धावता स्व-उद्योग! रावेतातील ‘कॅफे अरोमा’ तरुणाईच्या भेटीस सज्ज; आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते शुभारंभ!पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘बालस्नेही शहर’ निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल; शहरात धावणार विशेष “चाईल्ड फ्रेंडली बस”!‘स्व-निर्णयक्षमतेतूनच आत्मविश्वास वृद्धिंगत होतो’; PCCOE च्या स्वागत समारंभात संचालक डॉ. गोविंद कुलकर्णींचे प्रतिपादन!‘वैधानिक समित्यांचे अधिकार पायदळी तुडवल्याचा आरोप’; पिंपरी महापालिकेत पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्याविरोधात असंतोषाचा उद्रेक!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘बालस्नेही शहर’ निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल; शहरात धावणार विशेष “चाईल्ड फ्रेंडली बस”!

पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘बालस्नेही शहर’ निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल; शहरात धावणार विशेष “चाईल्ड फ्रेंडली बस”!

विशेष बाल पोलीस पथकाची स्तुत्य संकल्पना; बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या शुभांगी तांबट व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा अनोखा उपक्रम; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते “चाईल्ड फ्रेंडली बस”चा शुभारंभ!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: बालकांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या हक्काबाबत समाजामध्ये व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकारातून “चाईल्ड फ्रेंडली बस” (Child-Friendly Bus) या अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात आयोजित दिमाखदार सोहळ्यात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते या विशेष बसचे उद्घाटन करून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड ‘विशेष बाल पोलीस पथक’ आणि ‘होप फॉर दि चिल्ड्रेन फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम साकारण्यात आला आहे.

उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, “बालकांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने अत्यंत संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. बालकांसाठी सुरक्षित, संवेदनशील आणि भयमुक्त बालस्नेही शहर (Child-Friendly City) निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाच्या वतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवण्यात येत आहेत.”
ही ‘चाईल्ड फ्रेंडली बस’ पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत, शाळा-महाविद्यालये, वस्त्या आणि सार्वजनिक ठिकाणी फिरून बालहक्क संरक्षण, सुरक्षित बालपण, पोक्सो कायदा व बालकांशी संबंधित विविध विषयांवर जनजागृतीचे काम करणार आहे.

या सोहळ्यास महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या शुभांगी तांबट, होप फॉर दि चिल्ड्रेन फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ. कॅरोलीन, पोलीस सह-आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) गणेश इंगळे, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) धीरज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१ व नोडल अधिकारी विशेष बाल पोलीस पथक) सुदर्शन राठोड, भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक घार्गे यांच्यासह विशेष बाल पोलीस पथकाचे अधिकारी, अमलबजावणी कर्मचारी आणि सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!