6
तरुणाईच्या पसंतीचे ‘कॅफे अरोमा’ रावेत, शिंदे वस्ती येथे सुरू!
पुणे/पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी, पुणे: उच्च शिक्षण घेऊन केवळ नोकरीच्या शोधात वेळ घालविण्याऐवजी स्व-उद्योग उभारून काळाची गरज ओळखत शुभम गोरे आणि प्रणिता गोरे या नवदांपत्याने उद्योग क्षेत्रात पदार्पण केले आहे. रावेत, शिंदे वस्ती येथील उड्डाणपुलाजवळील ‘राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटी’ येथे तरुणाईच्या पसंतीचे ‘कॅफे अरोमा’ (Cafe Aroma) मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात सुरू करण्यात आले आहे.
‘कॅफे अरोमा’चे भव्य उद्घाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. या सोहळ्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, पत्रकार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘कॅफे अरोमा’चे संचालक शुभम गोरे आणि प्रणिता गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, रावेत व परिसरातील नागरिकांना तसेच तरुणाईला अत्यंत स्वच्छ, सुरक्षित, प्रशस्त वातावरणात आणि उत्तम आदरातिथ्य सेवेसह दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे. रावेत परिसरातील नागरिकांनी आपल्या कुटुंबिय आणि मित्रपरिवारासह खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ‘कॅफे अरोमा’ला नक्की भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
या सोहळ्यास नगरसेवक अपर्णा डोके, अनंत कोऱ्हाळे, शेखर चिंचवडे, आशाताई सूर्यवंशी, ऐश्वर्या तरस, रश्मी कातळे, पल्लवी वाल्हेकर, धम्मपाल तंतरपाळे, माजी नगरसेवक सचिन चिंचवडे, राजेंद्र गावडे, मोरेश्वर भोंडवे, राजेंद्र साळुंके यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते बापू कातळे, चिंचवड व्यापारी संघटनेचे प्रमुख राजू चिंचवडे, बांधकाम व्यावसायिक श्रीकांत भोंडवे, महापालिका सेवानिवृत्त अधिकारी पी. बी. गायकवाड, उद्योगपती सुमित वाढोवकर, सुशील वाढोवकर, अमोल भोंडवे उपस्थित होते.
तसेच पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील उर्फ बाबू कांबळे, रेहान सय्यद, संतोष जराड, गणेश शिंदे, सोशल मीडिया अध्यक्ष सूरज साळवी, पत्रकार देवा भालके, दिलीप देहाडे, जितेंद्र गवळी, शबनम सय्यद, अमोल डंबाळे, सोमनाथ काळे, भीमराव बरकडे, राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘कॅफे अरोमा’च्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी गोरे दांपत्याला शुभेच्छा दिल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
