news
पिंपरी-चिंचवड पोलिसांची बेकायदेशीर नागरिकांवर धडक कारवाई; आतापर्यंत २६ बांगलादेशी नागरिकांना केले डिपोर्ट!नोकरीच्या मागे न धावता स्व-उद्योग! रावेतातील ‘कॅफे अरोमा’ तरुणाईच्या भेटीस सज्ज; आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते शुभारंभ!पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘बालस्नेही शहर’ निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल; शहरात धावणार विशेष “चाईल्ड फ्रेंडली बस”!‘स्व-निर्णयक्षमतेतूनच आत्मविश्वास वृद्धिंगत होतो’; PCCOE च्या स्वागत समारंभात संचालक डॉ. गोविंद कुलकर्णींचे प्रतिपादन!‘वैधानिक समित्यांचे अधिकार पायदळी तुडवल्याचा आरोप’; पिंपरी महापालिकेत पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्याविरोधात असंतोषाचा उद्रेक!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड पोलिसांची बेकायदेशीर नागरिकांवर धडक कारवाई; आतापर्यंत २६ बांगलादेशी नागरिकांना केले डिपोर्ट!

पिंपरी-चिंचवड पोलिसांची बेकायदेशीर नागरिकांवर धडक कारवाई; आतापर्यंत २६ बांगलादेशी नागरिकांना केले डिपोर्ट!

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली एटीबीची धडक मोहीम; देहूरोडातून बांगलादेशी तरुणी पोलिसांच्या ताब्यात | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड एटीबीची (ATB) मोठी कारवाई; बनावट आधारकार्ड दाखवून वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलेला ठोकल्या बेड्या!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पोलीस आयुक्तालयाच्या दहशतवाद विरोधी शाखेने (ATB) धडक कारवाई करत देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृतपणे व बनावट कागदपत्रांच्या आधारे राहणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतले आहे. तन्हा खातून असे भासवणाऱ्या या महिलेचे मूळ नाव फिहा मो. मुजिबुर रहमान (वय १९, रा. बांगलादेश) असल्याचे तपासात उघड झाले असून, तिला मायदेशात हद्दपार (डिपोर्टेशन) करण्याची कायदेशीर प्रक्रिया विशेष शाखेमार्फत सुरू करण्यात आली आहे.

एटीबी (ATB) पिंपरी-चिंचवड पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी देहूरोड हद्दीतील ‘स्वर्ग लॉज’ येथे शोधमोहीम राबवण्यात आली. या वेळी पश्चिम बंगालची नागरिक असल्याचे सांगणाऱ्या तन्हा खातून हिच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता, तिच्याकडील आधारकार्ड बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी सखोल चौकशी व कसून तपास केला असता, तिचे मूळ नाव फिहा मो. मुजिबुर रहमान (वय १९, रा. ग्राम-बोयरा, पोस्ट-रायर छोरा, ठाणे-जमालपूर, जि. मदारगंज, बांगलादेश) असल्याचे तिने कबूल केले. ती सुमारे एका वर्षापूर्वी कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय बांगलादेशातून भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी करून आली होती. तसेच मोबाईलमधील ‘IMO’ ॲप व व्हॉट्सॲपद्वारे ती बांगलादेशातील तिच्या कुटुंबीयांशी संपर्कात होती. तिला पुढील कारवाईसाठी देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या दि. ०२ मे २०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अनधिकृतपणे वास्तव्यास असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे दाखल न करता त्यांना थेट मायदेशात हद्दपार (डिपोर्टेशन) करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.
या धोरणानुसार, दि. ०२ मे २०२५ ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पिंपरी-चिंचवड एटीबीने (ATB) एकूण २९ अनधिकृत बांगलादेशी नागरिकांना शोधून ताब्यात घेतले आहे. यापैकी २६ बांगलादेशी नागरिकांना यशस्वीपणे बांगलादेशात हद्दपार करण्यात आले असून, उर्वरित ३ नागरिकांवर हद्दपारीची कारवाई सध्या अंतिम टप्प्यात सुरू आहे.

सदर उल्लेखनिय कामगिरी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली आणि विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेच्या (ATB) पथकाने केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!