news
Home पिंपरी चिंचवड चिंचवडमध्ये ‘आयआयएमएस’च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र; मॉरिशसचे डॉ. आरिफ सलेरु उपस्थित!

चिंचवडमध्ये ‘आयआयएमएस’च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र; मॉरिशसचे डॉ. आरिफ सलेरु उपस्थित!

भविष्यातील आव्हानांसाठी कौशल्य विकास व चिकित्सक विचारसरणीवर भर देण्याचे आवाहन; यशस्वी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

विद्यार्थी जीवनातून व्यावसायिक जीवनात प्रवेश करताना जबाबदारीचे वर्तन आवश्यक: डॉ. आरिफ सलेरु

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिंचवड: विद्यार्थी जीवनातून व्यावसायिक (कारपोरेट) जीवनात प्रवेश करताना स्वयंशिस्त, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि स्वतः घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन मॉरिशसच्या ‘ला सेंटिनेल’ (La Sentinelle) उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आरिफ सलेरु यांनी व्यक्त केले.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (IIMS) च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

व्यावसायिक जगतात यशस्वी होण्यासाठी केवळ शैक्षणिक पदवी पुरेशी नसून व्यावहारिक कौशल्ये महत्त्वाची असतात, असे सांगून डॉ. सलेरु यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भविष्यातील करिअरविषयक नवीन कौशल्ये (Career Skills), चिकित्सक विचारसरणी (Critical Thinking), कोणत्याही कठीण समस्या सोडविण्याची क्षमता आणि बौद्धिक विकास यांबाबत सतत दक्ष राहण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला यशस्वी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, संचालक डॉ. शिवाजी मुंढे, डॉ. सचिन मिसाळ यांच्यासह संस्थेतील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. सलेरु यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!