news
Home पिंपरी चिंचवड ‘प्रातिभा जॉब फेअर २०२६’: आयटीआय ते इंजिनिअरिंग, एमबीए पदवीधरांना रोजगाराची मोठी संधी; डॉ. दीपक शहा यांचे आवाहन!

‘प्रातिभा जॉब फेअर २०२६’: आयटीआय ते इंजिनिअरिंग, एमबीए पदवीधरांना रोजगाराची मोठी संधी; डॉ. दीपक शहा यांचे आवाहन!

२९ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता प्रतिभा महाविद्यालयात मेळावा; १००० हून अधिक तरुणांना मिळणार थेट रोजगार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चिंचवडच्या प्रतिभा महाविद्यालयात २९ सप्टेंबरला ‘प्रातिभा जॉब फेअर २०२६’; १,००० हून अधिक रोजगाराच्या संधी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड:  चिंचवड येथील प्रातिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने प्रतिभा महाविद्यालय येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘प्रातिभा जॉब फेअर २०२६’ या रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे एम्प्लॉयमेंट ऑफिस तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व पुणे येथील उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या सहकार्याने हा मेळावा होणार आहे.
प्रातिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा हा ११ वा मेगा जॉब फेअर असून, विविध क्षेत्रातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच राष्ट्रीय स्तरावरील कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये ५० हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग अपेक्षित असून, सुमारे १,००० नोकरीच्या संधी जागेवर उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे संस्थापक सचिव डॉ . दीपक शहा यांनी दिली आहे.
या रोजगार मेळाव्यात फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. बी.कॉम., बीबीए, बीसीए, बी.एस्सी., एम.कॉम., एमबीए, एमसीए, एम.एस्सी., बीई, बी.टेक., एमई, एम.टेक., अभियांत्रिकी डिप्लोमा, फार्मसी आणि आयटीआय अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
मागील रोजगार मेळाव्यांना दरवर्षी १८० हून अधिक कंपन्यांचा सहभाग, सुमारे १० ते १५ हजार इच्छुक उमेदवारांची उपस्थिती आणि ५ हजारांहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
या मेळाव्यासाठी प्रवेश व नोंदणी विनामूल्य असून अधिक माहितीसाठी 8600100942 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करणे अनिवार्य असून इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे संस्थापक सचिव व जॉब फेअरचे मुख्य आयोजक डॉ . दीपक शहा यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!