news
Home सोलापूर शेतात काम करत असताना डाव्या पायाला विषारी सापाचा चावा; तामदर्डीतील शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू!

शेतात काम करत असताना डाव्या पायाला विषारी सापाचा चावा; तामदर्डीतील शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू!

खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली; नामदेव पुजारी यांच्या निधनाने परिसरात शोककळा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

तामदर्डी येथे शेतात काम करताना सर्पदंश झाल्याने ४५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; मंगळवेढा पोलिसांत नोंद!

मंगळवेढा (सोलापूर) प्रतिनिधी पंडित गवळी, दि. २३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

मंगळवेढा (सोलापूर): सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथे शेतात काम करत असताना सर्पदंश झाल्याने एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. नामदेव सिद्राम पुजारी (वय ४५, रा. तामदर्डी) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद मंगळवेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत नामदेव पुजारी हे सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास तामदर्डी येथील स्वतःच्या शेतात काम करत होते. शेतात काम करत असताना अचानक त्यांच्या डाव्या पायाला विषारी सापाने चावा घेतला.
सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी मंगळवेढा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

याबाबत औदुसिद्ध पुजारी यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये घटनेची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार वंदना घोडके करत आहेत. शेतकरी नामदेव पुजारी यांच्या अकाली निधनाने तामदर्डी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!