news
Home पुणे आळंदीच्या प्रा. संजय शिंदे यांचे शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश; पुणे विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती पदवी बहाल!

आळंदीच्या प्रा. संजय शिंदे यांचे शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश; पुणे विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती पदवी बहाल!

अध्यात्म अन् राजयोगाची जोड देत शैक्षणिक संशोधन पूर्ण; एम.आय.टी. परिवार व मान्यवरांकडून पाठीवर कौतुकाची थाप | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

प्रा. संजय शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’ पदवी प्रदान; ‘एज्युकेशन ४.०’ तंत्रज्ञानावरील संशोधनाला मान्यता!

पुणे/पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: माईर्स एम.आय.टी. संत ज्ञानेश्वर बी.एड. महाविद्यालय, आळंदी (देवाची) येथील शिक्षणशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक संजय पोपट शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित त्यांच्या विशेष संशोधनाला विद्यापीठाने मान्यता दिली आहे.

प्रा. संजय शिंदे यांनी आपले संशोधन शिक्षणशास्त्र (आंतरविद्याशाखा) या विद्याशाखेतून पूर्ण केले. त्यांना प्राचार्य डॉ. सुरेंद्र चंद्रकांत हेरकळ यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या संशोधनाचा विषय “Programme Based on Education 4.0 Technology for Developing Technological Skills of Teacher Trainees” (शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांच्या विकासासाठी एज्युकेशन ४.० तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्रम) असा होता. भावी शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम बनवण्यासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

शैक्षणिक क्षेत्रासोबतच प्रा. संजय शिंदे हे बालपणापासून ‘प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालया’शी जोडलेले असून, ते नियमित राजयोगाचा अभ्यास आणि साधना करतात. आध्यात्मिक मूल्यांची जोड देत त्यांनी हे शैक्षणिक यश संपादन केले आहे.

प्रा. संजय शिंदे यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल एम.आय.टी. संस्थेचे पदाधिकारी, एम.आय.टी. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, एम.आय.टी. बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समाधान निकुंभ, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच त्यांच्या मित्रपरिवाराने मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!