news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जलद तपासाला यश; बालिकेवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी रामू निसाद गजाआड!

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जलद तपासाला यश; बालिकेवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी रामू निसाद गजाआड!

विशेष सरकारी वकील स्मिता चौगुले यांचा प्रभावी युक्तिवाद; अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटिबद्ध | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अल्पवयीन पीडितेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील आरोपीस २० वर्षांची सक्तमजुरी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

भोसरी (पिंपरी): अल्पवयीन पीडित बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात पिंपरी-चिंचवड जिल्हा व सत्र न्यायालयाने अत्यंत तातडीने सुनावणी पूर्ण करत आरोपीला दोषी ठरवून २० वर्षांच्या कडक सक्तमजुरीची शिक्षा आणि दंडाची सुनावणी केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या जलद तपास आणि प्रभावी न्यायालयीन पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निकाल लागला आहे.
मा. एस. एन. यादव, विशेष व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पिंपरी-चिंचवड जिल्हा सत्र न्यायालय यांनी आरोपी रामू कंजल निसाद (वय ४० वर्षे, रा. शंभू कॉलनी, विनायक नगर, मोशी) यास दोषी ठरवून ही कडक शिक्षा सुनावली आहे.

सदर गंभीर गुन्हा ३ एप्रिल २०२६ रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. १८१/२०२६) भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१), ६५(२), ७४, ३५१ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा कलम ४, ६, ८ अन्वये दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती चैत्राली भिसे यांनी अत्यंत तत्परतेने पूर्ण करून अवघ्या ३० दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल केले. अभियोग पक्षाच्या वतीने हा खटला जलद गतीने चालवण्याची विनंती करण्यात आली होती. मा. न्यायालयाने ही विनंती मान्य करत सुनावणी पूर्ण करून २२ सप्टेंबर २०२६ रोजी अंतिम निकाल घोषित केला.
BNS कलम ६४(१)  २० वर्षे कारावास व रु. १०,०००/- दंड (दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास), BNS कलम ६५(२)  २० वर्षे कारावास व रु. १०,०००/- दंड (दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास), BNS कलम ७४ ३ वर्षे कारावास व रु. १०,०००/- दंड (दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास), BNS कलम ३५१  ३ वर्षे कारावास व रु. १०,०००/- दंड (दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास), पोक्सो कायदा कलम ४  २० वर्षे कारावास व रु. १०,०००/- दंड (दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास), पोक्सो कायदा कलम ६  २० वर्षे कारावास व रु. १०,०००/- दंड (दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास), पोक्सो कायदा कलम ८   ५ वर्षे कारावास व रु. १०,०००/- दंड (दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास).  (टीप: वरील सर्व शिक्षा आरोपीला एकत्रित भोगावयाच्या आहेत.)

या खटल्यामध्ये विशेष सरकारी अभियोक्ता श्रीमती स्मिता मुकुंद चौगुले यांनी सरकार पक्षातर्फे साक्षीदारांची साक्ष नोंदवून अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडली. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी महिला पोलीस हवालदार एस. आर. सरसे यांनी न्यायालयीन कामकाजात उत्कृष्ट समन्वय साधला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-३) मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, अशा गुन्ह्यांत गुन्हेगारांना कठोर कायदेशीर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचे पोलीस उपआयुक्त मारुती जगताप यांनी स्पष्ट केले.
© २०२६ मॅक्स मंथन Daily News. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!