news
Home पिंपरी चिंचवड ‘गुन्हेगारांना सोडणार नाही’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई, सराईत टोळी गजाआड!

‘गुन्हेगारांना सोडणार नाही’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई, सराईत टोळी गजाआड!

सोन्याचे मंगळसूत्र अन् चोरीची दुचाकी हस्तगत; वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या पथकाची कामगिरी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची उल्लेखनीय कामगिरी; १०० सीसीटीव्हीच्या तपासाअंती चेन स्नॅचिंग व वाहन चोरीचे गुन्हे उघड!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. २४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: गेल्या १० दिवसांपासून सतत पाठपुरावा करत आणि सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून पाहणी करत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने चेन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. या धडक कारवाईत रेकॉर्डवरील आरोपींसह त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, युनिट-३ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे व त्यांचे पथक एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल चेन स्नॅचिंगच्या (गु. रजि. नं. ६३२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५)) गुन्ह्याचा समांतर तपास करत होते.
दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी तपास सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, अजित रूपनवर, बाळासाहेब भांगले, सुंदर थोरात, तुषार वराडे आणि दिलीप राठोड यांना बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपी आदर्श नगर, मोशी परिसरात फिरत आहेत.

मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलिसांनी संघर्ष कॉलनी, आदर्श नगर, मोशी येथे छापा टाकून तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे इंदर अनिल राजपूत (वय २२, रा. आदर्श नगर, मोशी), महेश कान्हा राजपूत (वय २६, रा. मोहन नगर, गोडाऊन चौक, मोशी), एक विधिसंघर्षित बालक (अल्पवयीन)
अशी असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता, त्यांनी सेक्टर ४, प्राधिकरण मोशी येथून रात्रीच्या वेळी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरी केल्याची आणि मु.पो. कोळविहिरे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथून होंडा युनिकॉन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पंचांसमक्ष सोन्याचे मंगळसूत्र आणि युनिकॉन दुचाकी जप्त केली आहे.
उघडकीस आलेले गुन्हे
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे  गु. रजि. नं. ६३२/२०२६ (BNS कलम ३०९(४), ३(५)) – चेन स्नॅचिंग
जेजुरी पोलीस ठाणे  गु. रजि. नं. २८४/२०२६ (BNS कलम ३०३(२)) – दुचाकी चोरी
पकडण्यात आलेले आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर दिघी, एमआयडीसी भोसरी, चाकण आणि वाकड पोलीस ठाण्यात यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जोनापल्ले करत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, भरत गोसावी, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, अजित रूपनवर, बाळासाहेब भांगले, सुंदर थोरात, तुषार वराडे, दिलीप राठोड, स्वप्निल महाले, शशिकांत नांगरे आणि सचिन गोनटे यांनी केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!