news
Home मुख्यपृष्ठ मतदार याद्यांमधील कथित गडबडीवरून निवडणूक आयोग अडचणीत; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली!

मतदार याद्यांमधील कथित गडबडीवरून निवडणूक आयोग अडचणीत; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली!

अभिजित दीपके यांचा 'X' वरून थेट इशारा; २ ऑक्टोबरपासून देशभरातील प्रमुख शहरांमध्ये आंदोलनाची तयारी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP आक्रमक; २ ऑक्टोबरपासून देशभरात आंदोलनाचा ‘कॉकरोच जनता पार्टी’चा इशारा!

नवी दिल्ली , प्रतिनिधी दि. २५ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी शनिवारपर्यंत आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही, तर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) २ ऑक्टोबर रोजी (गांधी जयंती) मुंबईपासून देशभरात तीव्र आंदोलन छेडणार असल्याची घोषणा CJP चे संस्थापक अभिजित दीपके यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि मतदार याद्यांमधील कथित गडबडीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, CJP ने मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर (ट्विटर) पोस्ट करत अभिजित दीपके यांनी लिहिले की, “ज्ञानेश कुमार यांनी उद्यापर्यंत राजीनामा दिला नाही, तर CJP २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून मुंबईतून देशव्यापी आंदोलनाची सुरुवात करेल आणि हे आंदोलन भारतातील प्रमुख शहरांमध्ये नेले जाईल. या गांधी जयंतीला लोकशाही वाचवण्याचा संकल्प करूया.”
यापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांना ४८ तासांचा अल्टीमेटम दिला होता. राजीनामा न मिळाल्यास ‘जंतर मंतर २.०’ आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

यावेळी बोलताना अभिजित दीपके यांनी केवळ निवडणूक आयोगावरच नव्हे, तर विरोधी पक्षांच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली.  निवडणूक प्रक्रियेत हेरफेर होत असल्याचा आरोप करत असतानाही विरोधी पक्ष निवडणुका का लढवत आहेत? अशा निवडणुकांमध्ये सहभागी झाल्याने त्या निष्पक्ष आणि पारदर्शक असल्याचा चुकीचा आभास निर्माण होतो, असा दावा त्यांनी केला.राजकीय अस्तित्व संपण्याच्या भीतीने विरोधी पक्ष निवडणूक लढवत आहेत का? असा प्रश्न विचारत, विरोधी पक्ष आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि पक्षांनुसार निवडणूक हेरफेरीचे मुद्दे उपस्थित करतात, असा आरोपही दीपके यांनी केला.

 

एका वृत्तपत्राच्या तपासी अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत मतदार नोंदणी, नाव वगळणे आणि मतदार याद्यांमधील बदलांशी संबंधित निर्णयांवर तब्बल १४ वेळा औपचारिक आक्षेप नोंदवले होते.
या वादानंतर CJP आणि इतर विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची आणि संपूर्ण प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, निवडणूक आयोगाने सर्व निर्णय सर्वसंमतीने आणि नियमांनुसारच घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!