news
Home पिंपरी चिंचवड ‘उद्योग क्षेत्रात महिलांचे उज्ज्वल भवितव्य’; इंजिनिअरिंग क्लस्टर पुणेतर्फे ‘इंडस्ट्रियल एस्पायरा’ उपक्रम!

‘उद्योग क्षेत्रात महिलांचे उज्ज्वल भवितव्य’; इंजिनिअरिंग क्लस्टर पुणेतर्फे ‘इंडस्ट्रियल एस्पायरा’ उपक्रम!

१२ वी उत्तीर्ण युवतींना सीएनसी प्रोग्रामिंग, डिझाईन अन् क्वालिटी कंट्रोलचे धडे; संचालक सागर शिंदे यांचे नावनोंदणीचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

इंजिनिअरिंग क्लस्टर येथे महिलांसाठी मोफत ‘इंडस्ट्रियल एस्पायरा’ तांत्रिक प्रशिक्षण वर्गाचे आयोजन!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: युवती आणि महिलांना अभियांत्रिकी (Engineering) व उत्पादन (Manufacturing) क्षेत्रात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘इंजिनिअरिंग क्लस्टर, पुणे’ या संस्थेच्या वतीने महिलांसाठी मोफत ६ महिन्यांचे ऑफलाइन तांत्रिक प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती इंजिनिअरिंग क्लस्टरचे संचालक सागर शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
‘ला फाउंडेशन डसॉल्ट सिस्टीम, पुणे’ यांच्या सीएसआर (CSR) सहकार्याने २८ सप्टेंबर २०२६ पासून पूर्णतः मोफत असलेल्या “इंडस्ट्रियल एस्पायरा – ॲडव्हान्स सर्टिफिकेशन इन सीएनसी ऑपरेशन डिझाईन अँड क्वालिटी कंट्रोल” या तांत्रिक प्रशिक्षण वर्गाच्या तिसऱ्या बॅचचा शुभारंभ होत आहे.

पहिल्या दोन यशस्वी बॅचच्या भरघोस प्रतिसादानंतर या तिसऱ्या बॅचचे आयोजन करण्यात आले आहे. या ६ महिन्यांच्या उपक्रमांतर्गत उद्योगाभिमुख (Industry-Oriented) प्रशिक्षण दिले जाणार असून त्यामध्ये प्रामुख्याने सीएनसी प्रोग्रामिंग व ऑपरेशन (CNC Programming & Operation), इंडस्ट्रियल डिझाईन व मॅन्युफॅक्चरिंग (Design & Manufacturing), क्वालिटी कंट्रोल (Quality Control), सॉफ्ट स्किल्स, प्रात्यक्षिके आणि प्रत्यक्ष औद्योगिक भेटी (Industrial Visits), ऑन द जॉब ट्रेनिंग (On the Job Training – OJT)

 

किमान १२ वी उत्तीर्ण आणि १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवती व महिला.  ६ महिने (आरंभ: २८ सप्टेंबर २०२६). इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे, भोसरी एमआयडीसी, ५३६ जे ब्लॉक, गवळीमाथा जवळ, पुणे.  निवडक ५ ग्रामीण भागातील प्रशिक्षणार्थींसाठी निवास आणि भोजनाची व्यवस्था पूर्णतः मोफत असेल. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर पुणे व परिसरातील नामांकित इंजिनिअरिंग व मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांमध्ये १००% प्लेसमेंट सपोर्ट उपलब्ध करून दिला जाणार आहे.

 

इंजिनिअरिंग क्लस्टर पुणेचे संचालक सागर शिंदे यांनी आवाहन केले आहे की, “तांत्रिक क्षेत्रात स्वतःचे करिअर घडवू इच्छिणाऱ्या महिलांनी व युवतींनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क   इंजिनिअरिंग क्लस्टर, ५३५ जे ब्लॉक, गवळीमाथा, एमआयडीसी भोसरी, पुणे.
ई-मेल: finance@enggclusterpune.com
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!