news
Home पिंपरी चिंचवड ‘बॅडमिंटन कोर्टवर तरुणाईचा जलवा’; जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत मुला-मुलींच्या ६४ संघांचा सहभाग!

‘बॅडमिंटन कोर्टवर तरुणाईचा जलवा’; जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत मुला-मुलींच्या ६४ संघांचा सहभाग!

PCCOE निगडी येथे रंगला अंतिम सामन्याचा थरार; विजेत्या संघांवर पीसीईटी (PCET) विश्वस्तांकडून अभिनंदनाचा वर्षाव | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात DYPCOE आकुर्डी, तर मुलींच्या गटात PCCCS चिंचवड संघ विजयी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २५ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (PCCOE, निगडी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा विभागीय आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (DYPCOE), आकुर्डी संघाने, तर मुलींच्या गटात प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर सायन्स (PCCCS), चिंचवड संघाने विजेतेपद पटकावले.

PCCOE येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुलांचा गट डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (DYPCOE), आकुर्डी संघाने यजमान पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (PCCOE), निगडी संघाचा ३-१ अशा गुणफरकाने पराभव करत प्रथम क्रमांक पटकावला. मुलींचा गट प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर सायन्स (PCCCS), चिंचवड संघाने PCCOE, निगडी संघावर २-० अशी मात करत अजिंक्यपद मिळवले.

मुलांचा विभाग
  1. प्रथम क्रमांक: DYPCOE, आकुर्डी
  2. द्वितीय क्रमांक: PCCOE, निगडी
  3. तृतीय क्रमांक: PCCOER, रावेत
मुलींचा विभाग
  1. प्रथम क्रमांक: PCCCS, चिंचवड
  2. द्वितीय क्रमांक: PCCOE, निगडी
  3. तृतीय क्रमांक: ALC, कान्हे

या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक नरेंद्र लांडगे व अजिंक्य काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. अक्षय काशीद, डॉ. गणेश चव्हाण आणि SPPU चे अधिसभा सदस्य डॉ. रमेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील मुलांचे ३५ आणि मुलींचे २९ संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या समाप्तीनंतर PCCOE चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, डीन एसडीडब्ल्यू डॉ. पद्माकर देशमुख आणि स्पर्धेचे समन्वयक प्रा. संतोष पाचारणे यांच्या हस्ते विजेत्या संघांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
विजेत्या सर्व खेळाडूंचे व संघांचे पीसीईटीचे (PCET) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि PCCOE चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी विशेष अभिनंदन केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!