16
एमबीए म्हणजे उज्ज्वल भविष्य घडविण्याचा राजमार्ग: रवींद्रन गजेंद्रन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. २६ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “एमबीए (MBA) हे केवळ एक शिक्षण नसून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा तो एक मुख्य राजमार्ग आहे. हे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित केल्या पाहिजेत. आजचा विद्यार्थी हा उद्याच्या मोठ्या कॉर्पोरेट संस्थांचा व्यवस्थापक (मॅनेजर) आहे. ही मोठी जबाबदारी पेलण्यासाठी आत्मविश्वास अत्यंत आवश्यक असून, तो विकसित करण्याचे काम एसबीपीआयएम संस्था सातत्याने करत आहे,” असे प्रतिपादन ‘डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस’चे कॉर्पोरेट वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्रन गजेंद्रन यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) आकुर्डी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (SBPIM) येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित “आरंभ २०२६ इंडक्शन प्रोग्राम” च्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना सांगितले की, “एमबीए हे पुढील संपूर्ण जीवनाला योग्य आकार देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात माऊथ (संवाद), माईंड (विचार), मूड (भावना नियंत्रण), मनी (आर्थिक नियोजन) आणि मॅनर्स (शिष्टाचार) या ५ घटकांचा मूलमंत्र अंगीकारून आचरण करावे.”
एमडॉक्स कंपनीचे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग डायरेक्टर रवींदर पाल सिंग म्हणाले की, “आज एआय (Artificial Intelligence) आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. विद्यार्थ्यांनी आपली संशोधन आणि सर्जनशीलता टिकवून ठेवली पाहिजे, अन्यथा एआय तंत्रज्ञान तुम्हाला मागे टाकेल. एआयसोबत स्वतःचा विकास केल्यास यश निश्चित आहे.”

येस बँक ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट समीर मुळे यांनी सांगितले की, “शैक्षणिक काळात येणाऱ्या विविध अनुभवांतून विद्यार्थ्यांनी स्वतःला अष्टपैलू बनवावे. स्वतःला विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता मोठ्या ध्येयाचा पाठपुरावा करावा.”
एम. वूडपीकर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक समीर कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना निरर्थक गोष्टींमध्ये वेळ न घालवता स्वतःचा संपर्क, शब्दसंग्रह आणि संवाद कौशल्य समृद्ध करण्याचा सल्ला दिला.
या सोहळ्यात पाहुण्यांच्या हस्ते “व्यावसायिक बुद्धिमत्ता आणि आर्थिक निरीक्षण प्रणाली” या विद्यार्थ्यांच्या विशेष रिसर्च प्रोजेक्टचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. तसेच ‘इनोव्हेंट ड्रम सर्कल’ या संस्थेने ‘जम्बेग’ वादनातून संगीताच्या सुरांवर आधारित एक अनोखा प्रेरणादायी अनुभव सादर केला.
हा कार्यक्रम पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रा. ऐश्वर्या गोपालकृष्णन, डॉ. योगेंद्र देवकर, प्रा. डॉ. प्रणिता बुरबुरे, डॉ. विशाल वाघ आणि प्रा. डॉ. काजल माहेश्वरी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन व डॉ. प्रणिता बुरबुरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. काजल माहेश्वरी यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
