news
Home मावळमहाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मंगळवेढ्यात रणशिंग

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मंगळवेढ्यात रणशिंग

निवडणुका, संघटन आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर चर्चा

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मंगळवेढा, सोलापूर: मंगळवेढा तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. तालुक्याचे ज्येष्ठ नेते मा. राहुलजी शहा शेट यांच्या निवासस्थानी आयोजित या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विस्तृत चर्चा करण्यात आली.

या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मा. लक्ष्मणराव ढोबळे सर, शहराध्यक्ष मा. चंद्रशेखर कोंडूभैरी, तालुकाध्यक्ष मा. प्रथमेश पाटील, बोला झाले माणिक गुंगे कार्याध्यक्ष, मा. संतोष रंदवे (मतदारसंघ कार्याध्यक्ष) आणि पंडीत गवळी, नानासो करपे, सागर गुरव यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत खालील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली:

  • आगामी निवडणुकांसाठी क्षेत्रनिहाय रणनीती आखणे.
  • बूथ पातळीवर पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणे.
  • नवमतदारांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्यात जनजागृती करणे.
  • विकासकामांचा आढावा घेणे आणि जनतेच्या अपेक्षा जाणून घेणे.
  • कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी नियमित संवाद साधणे.

बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना, उपस्थितांनी एकजुटीने, शिस्तबद्ध आणि लोकहिताच्या दृष्टिकोन ठेवून काम करण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष निश्चितच विजय मिळवेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. या बैठकीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, निवडणुका जिंकण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

हे बातमी मॅक्स मंथन डेली न्यूजचे सोलापूर प्रतिनिधी पंडित गवळी यांनी दिली.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!