news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडचे ‘सावली’ बेघर निवारा केंद्र ठरले राज्याचे नंबर वन!

पिंपरी-चिंचवडचे ‘सावली’ बेघर निवारा केंद्र ठरले राज्याचे नंबर वन!

गरजू आणि बेघरांसाठी आधारवड; राज्यस्तरीय पाहणीत सर्वोत्तम ठरले!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ‘सावली’ बेघर निवारा केंद्र राज्यामध्ये अव्वल ठरले आहे! दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत चालविल्या जाणाऱ्या या केंद्राने गरजू, बेघर आणि असहाय्य नागरिकांसाठी एक सुरक्षित आणि आधारवड देणारे स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समितीने केलेल्या पाहणीत ‘सावली’ राज्यामध्ये सर्वोत्तम ठरले आहे.

राज्यस्तरीय समितीने त्रयस्थ संस्थेमार्फत केलेल्या मूल्यांकनात पिंपरी-चिंचवडचे ‘सावली’ बेघर निवारा केंद्र पहिल्या क्रमांकावर आले आहे. या केंद्राने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ग्रेस बेघर निवारा आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या शहरी बेघर निवारा केंद्राला मागे टाकले आहे.

२०२० मध्ये झाली केंद्राची सुरुवात:

शहरातील बेघर व्यक्तींच्या सर्वेक्षणात १५२ लाभार्थी आढळल्यानंतर, ऑक्टोबर २०२० मध्ये पिंपरी भाजी मंडईच्या पहिल्या मजल्यावर सुमारे १९ हजार चौरस फुटांच्या जागेत ‘सावली’ निवारा केंद्राची स्थापना झाली. १११ व्यक्तींची निवास क्षमता असलेले हे केंद्र रेल्वे स्थानकाजवळ आणि बसस्थानकापासूनही सोयीच्या अंतरावर आहे.

आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज:

‘सावली’ निवारा केंद्रामध्ये पुरुष, महिला, बेघर कुटुंबे आणि दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था आहे. २३ खोल्या असलेल्या या केंद्रात बेघर कुटुंबांसाठी ७ खोल्या उपलब्ध आहेत. यासोबतच स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत गरम पाणी, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वयंपाकगृह, लॉकर, मनोरंजनासाठी टीव्ही, वृत्तपत्रे, सीसीटीव्ही आणि अग्निशमन यंत्रणा यांसारख्या आधुनिक सुविधा येथे पुरविल्या जातात. या केंद्राचे व्यवस्थापन ‘रिअल लाईफ रिअल पिपल’ ही सामाजिक संस्था पाहते.

विविध उपक्रम आणि पुनर्वसनावर भर:

या निवारा केंद्रामध्ये बेघर व्यक्तींसाठी नियमित आरोग्य तपासणी, आधार कार्ड नोंदणी, बँक खाती उघडणे, बचत गट तयार करणे, लसीकरण आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या जातात. आतापर्यंत ३१२ बेघर व्यक्तींचे पुनर्वसन त्यांच्या मूळ गावी किंवा नातेवाईकांकडे करण्यात आले आहे, तर १६५ जणांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे.

आयुक्त शेखर सिंह यांचे मत:

महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, ‘सावली’ निवारा केंद्र केवळ निवासाचे ठिकाण नसून, तेथील व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेले एक प्रेरणादायी केंद्र बनले आहे. सुरक्षितता, स्वच्छता आणि मानवी सन्मानाला येथे प्राधान्य दिले जाते आणि राज्यातील सर्वोत्कृष्ट ठरल्याचा आम्हाला अभिमान आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे हे ‘सावली’ बेघर निवारा केंद्र खऱ्या अर्थाने गरजू आणि बेघर लोकांसाठी एक आशेचा किरण ठरले आहे.

Sources

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!