news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी!

कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी!

माणिकराव कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता.

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी! माणिकराव कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान! (मॅक्स मंथन डेली न्यूज, छत्रपती संभाजीनगर)

‘ढेकळांचे पंचनामे’नंतर आता ‘ओसाड गावची पाटीलकी’; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता!

छत्रपती संभाजीनगर: “कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते दिले आहे,” असे वादग्रस्त विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये केले. यापूर्वी ‘ढेकळांचे पंचनामे करायचे का?’ या त्यांच्या विधानामुळे ते टीकेचे धनी ठरले होते. आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने ते चर्चेत आले आहेत.

अ. भा. बळीराजा संघटना भारततर्फे एमजीएमच्या आर्यभट्ट सभागृहात शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. अजित पवार यांनी जाणीवपूर्वक कृषी खाते दिल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीविषयक शिक्षण घेऊन शेती आधारित व्यवसायात करिअर करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

‘ढेकळांचे पंचनामे’वर कोकाटेंचे स्पष्टीकरण:

“हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?” या विधानावर माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “मी असं काही बोललोच नाही,” असे त्यांनी सांगितले. राज्यात अनेक ठिकाणी पेरणी पूर्ण झाली असून फळबागांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काही ठिकाणी कांद्याचेही नुकसान झाले आहे. जेवढं नुकसान झालं आहे, त्यानुसार पंचनामे करण्यास सांगितलं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे.

कोकाटेंच्या या नव्या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शेतकऱ्यांसह विरोधी पक्षांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!