news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड यमुनानगरमध्ये घाण आणि भीती!

यमुनानगरमध्ये घाण आणि भीती!

तातडीने स्वच्छता आणि सुरक्षा करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी. (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी-चिंचवड)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

यमुनानगर सेक्टर २१ मधील गंभीर अस्वच्छता! तातडीने उपाययोजना करा! (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी-चिंचवड)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची आयुक्तांना मागणी.

पिंपरी: यमुनानगर सेक्टर क्रमांक २१ येथील पोस्ट ऑफिसजवळ निर्माण झालेल्या गंभीर अस्वच्छतेबाबत आणि असुरक्षिततेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) च्या सामाजिक न्याय विभागाने केली आहे. याबाबत पक्षाचे सचिव सुनिल कांबळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना पत्र लिहिले आहे.

पत्रात नमूद केल्यानुसार, यमुनानगर सेक्टर २१ मधील पोस्ट ऑफिसजवळ मोठ्या प्रमाणात कचरा आणि दारूच्या बाटल्या साचल्या आहेत. या ठिकाणी नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे आणि कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. श्री. अमर बंडू उघडे यांनी दूरध्वनीवरून याची माहिती दिल्यानंतर पाहणी केली असता, परिस्थिती खरोखरच गंभीर असल्याचे निदर्शनास आले.

या परिसरात सायंकाळनंतर काही असामाजिक तत्वांचा वावर वाढल्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे सुनिल कांबळे यांनी आयुक्तांना पुढील मागण्या केल्या आहेत:

  • सदर ठिकाणी तातडीने स्वच्छता करून संपूर्ण परिसर स्वच्छ करावा.
  • दारूच्या बाटल्या व कचरा योग्य प्रकारे उचलून त्याची विल्हेवाट लावावी.
  • परिसरात सुरक्षा रक्षक नेमावेत किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयुक्तांना या गंभीर विषयावर तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.

या संदर्भातील पुढील कार्यवाहीसाठी ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ सोबत राहा.

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!