news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड ‘कॉफी विथ कमिशनर’: महिला सक्षमीकरणाचा संवाद!

‘कॉफी विथ कमिशनर’: महिला सक्षमीकरणाचा संवाद!

थेरगाव आणि भोसरी शिलाई केंद्रातील महिलांनी आयुक्तांशी मनमोकळी चर्चा. (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी-चिंचवड)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘कॉफी विथ कमिशनर’: महिला सक्षमीकरणाचा संवाद!

थेरगाव आणि भोसरी शिलाई केंद्रातील महिलांनी आयुक्तांशी मनमोकळी चर्चा. (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी-चिंचवड)

पिंपरी, दि. २ जून २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘कॉफी विथ कमिशनर’ उपक्रमात आज महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या थेरगाव आणि भोसरी येथील शिलाई केंद्रातील महिलांनी सहभाग घेतला. या दोन्ही केंद्रातील महिलांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याशी थेट संवाद साधला.

कोरोना महामारीत ज्या महिला विधवा झाल्या, त्यांना रोजगार मिळावा आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, यासाठी महापालिकेने थेरगाव येथे शिलाई केंद्र सुरू केले आहे. तर भोसरी येथील केंद्र महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने कार्यरत आहे. या दोन्ही केंद्रातील महिलांना आज आयुक्त शेखर सिंह यांच्याशी थेट बोलण्याची संधी मिळाली. या वेळी उपायुक्त ममता शिंदे, सहाय्यक समाजविकास अधिकारी संतोषी चौरगे आणि दोन्ही केंद्रातील अनेक महिला उपस्थित होत्या.

आयुक्त शेखर सिंह यांनी सुरुवातीला महिलांना त्यांच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणींविषयी विचारपूस केली. महिला सक्षमीकरणासाठी महापालिका करत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. आगामी काळात थेरगाव आणि भोसरी येथील केंद्रांना नियमित काम मिळावे, यासाठी विविध संस्था आणि कंपन्यांचे गणवेश तयार करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आवश्यक प्रशिक्षणही महिलांना दिले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. या वेळी ‘नवी दिशा’ उपक्रमांतर्गत भविष्यातील संधी, आव्हाने आणि अनुभवांवर महिलांनी आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली.

कोरोनानंतर रोजगार गेल्याने आम्ही हताश झालो होतो. पण महापालिकेच्या थेरगाव केंद्राने आम्हाला मोठा आधार दिला. आज आयुक्तांना भेटून आम्हाला आमच्या समस्या आणि सूचना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवता आल्या. आमच्या सूचनांवर नक्कीच विचार होईल, याची खात्री आहे.

  • मीना चौधरी, थेरगाव शिलाई केंद्र

महापालिका प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे आम्हाला काम करण्याचा उत्साह मिळतो. आज आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मिळाली आणि भविष्यातही महापालिका आमच्या पाठीशी उभी राहील याची खात्री झाली.

  • स्मिता अंकुशे, भोसरी शिलाई केंद्र

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!