news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड वारीसाठी तयारी अंतिम टप्प्यात! आयुक्तांचे महत्वाचे निर्देश!

वारीसाठी तयारी अंतिम टप्प्यात! आयुक्तांचे महत्वाचे निर्देश!

पिंपरी-चिंचवड महापालिका सज्ज; आकुर्डीतील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची पाहणी. (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी-चिंचवड)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कसर ठेवू नका! आयुक्तांचे निर्देश! (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी-चिंचवड)

आषाढी वारीच्या तयारीचा आढावा; आकुर्डीतील मुक्काम आणि वारकरी भवनाच्या जागेची पाहणी.

पिंपरी, २ जून २०२५: आषाढी वारीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, असे स्पष्ट निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी सर्व यंत्रणांनी समन्वय साधून आवश्यक सुविधांचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १९ जून रोजी पिंपरी चिंचवड शहरात आगमन होणार असून, या दिवशी पालखी आकुर्डी येथे मुक्काम करणार आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २० जून रोजी पिंपरी चिंचवड हद्दीत आगमन होऊन ती त्याच दिवशी पुण्याकडे प्रस्थान करणार आहे. या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी आयुक्त शेखर सिंह यांनी संत तुकाराम महाराज पालखीच्या आकुर्डी येथील मुक्कामाच्या ठिकाणाची आणि प्रस्तावित वारकरी भवनाच्या जागेची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

या पाहणी दौऱ्यात शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, उपायुक्त अण्णा बोदडे, नगर रचनाकार प्रशांत शिंपी, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अभियंता वैशाली ननावरे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, हभप माणिकबुवा मोरे, हभप जगन्नाथ पाटील, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी माजी नगरसेवक प्रमोद कुटे, गुलाब कुटे, दयानंद शेवाळे, रविंद्र जाधव, अशोक वाळुंज, सौरभ शिंदे, दत्ता चिंचवडे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव आप्पा बागल आदी उपस्थित होते.

पालखी विसाव्याच्या ठिकाणाची पाहणी करताना आयुक्त सिंह यांनी तेथील सोयीसुविधांची सखोल माहिती घेतली. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यात याव्यात. मुक्कामाच्या रस्त्यांवरील आणि पालखी मार्गावरील कचरा तातडीने हटवावा. पालखी विसाव्याच्या आणि मार्गाच्या ठिकाणी नियमित साफसफाई करावी. तसेच, पावसाचे पाणी कुठेही साचणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!