news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनोखा सन्मान! भरत जाधव यांच्या उपस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी चित्रपट!

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनोखा सन्मान! भरत जाधव यांच्या उपस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी चित्रपट!

भरत जाधव यांनी साधला पिंपरी-चिंचवडमधील सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद. (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी-चिंचवड)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भरत जाधव यांनी साधला सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद! (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी-चिंचवड)

महापालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग!

पिंपरी, २ जून २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘आता थांबायचं नाय’ या प्रेरणादायी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले. या उपक्रमाचे सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भरत जाधव यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, शिक्षणासाठी झगडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आवाज या चित्रपटातून लोकांपर्यंत पोहोचेल.

महापालिका आपल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी आणि त्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवते. याच अंतर्गत, आरोग्य विभागातर्फे ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत आज पिंपरीतील विशाल सिनेमामध्ये सफाई सेवकांसाठी ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचे खास स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते.

या विशेष कार्यक्रमाला उप आयुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड यांच्यासह विशाल थिएटरचे संचालक वसंत पिंपळे, विशाल पिंपळे, युवराज पिंपळे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

अभिनेते भरत जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सफाई सेवक शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची मोठी जबाबदारी पार पाडतात. ते स्वच्छतेचे खरे नायक आहेत. ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट एका सामान्य माणसाच्या जिद्दीची कहाणी आहे. शिक्षण सर्वांसाठी महत्त्वाचे आहे, मग तो अधिकारी असो वा सफाई कामगार, हा संदेश या चित्रपटातून मिळतो. शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची कथा मला खूप भावली.

उप आयुक्त सचिन पवार म्हणाले की, ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट सफाई सेवकांच्या दैनंदिन जीवनातील संघर्ष, अडचणी आणि अनुभवांवर आधारित आहे. या चित्रपटातून त्यांचे कार्य प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या स्क्रीनिंगचा उद्देश सफाई कामगारांच्या मेहनतीची दखल घेणे आणि त्यांच्या कामाबद्दल समाजात आदर निर्माण करणे हा आहे.

कार्यक्रमादरम्यान, उपस्थित सर्वांनी अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत स्वच्छतेची शपथ घेतली. चित्रपट पाहिल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी हा चित्रपट हृदयस्पर्शी असल्याचे मत व्यक्त केले आणि भरत जाधव यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पवार यांनी केले, सूत्रसंचालन आणि स्वच्छता शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर अण्णा बोदडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!