news
Home मुख्यपृष्ठ सोलापूरच्या सहकार क्षेत्रात ‘जनकल्याण’चा डंका!

सोलापूरच्या सहकार क्षेत्रात ‘जनकल्याण’चा डंका!

दैनिक पुण्यनगरीच्या २३ व्या वर्धापनदिनी विशेष सन्मान; पालकमंत्री जयकुमार गोरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न.(मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दैनिक पुण्यनगरीचा २३ वा वर्धापनदिन उत्साहात; ‘द पॉवर ऑफ सोलापूर’ सत्कार सोहळ्यात जनकल्याण मल्टीस्टेटचा गौरव!

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मान; सोलापूर जिल्ह्याच्या विकासातील योगदानाला सलाम!

प्रतिनिधी पंडित गवळी, सोलापूर, १७ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे सोमवार, दिनांक १६ जून २०२५ रोजी दैनिक पुण्यनगरीच्या २३ व्या वर्धापनदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या खास दिनानिमित्त दैनिक पुण्यनगरीने ‘द पॉवर ऑफ सोलापूर सत्कार सोहळा २०२५’ चे आयोजन केले होते. या सोहळ्यात सोलापूर जिल्ह्याच्या सहकार, औद्योगिक, सेवा उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.


जनकल्याण मल्टीस्टेटचा सहकार क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल सन्मान!

या सत्कार सोहळ्यात सहकार क्षेत्रातील मागील तेरा वर्षांतील भरीव योगदानाबद्दल जनकल्याण मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीला सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरवण्यात आले. महाराष्ट्राचे सहकारमंत्री मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते हे सन्मानचिन्ह संस्थेचे संस्थापक चेअरमन मा. श्री. राजेंद्र हजारे साहेब आणि संचालक मा. श्री. रणजीत हजारे यांनी स्वीकारले. सहकारमंत्र्यांच्या हस्ते मिळालेल्या या सन्मानामुळे जनकल्याण मल्टीस्टेटच्या कारभाराला आणि योगदानाला अधिकृतपणे मान्यता मिळाल्याचे दिसून आले.


पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा संपन्न

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे यांनी भूषवले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

याप्रसंगी सहकार परिषदेचे अध्यक्ष मा. ना. श्री. राजनजी पाटील, अक्कलकोटचे आमदार मा. श्री. सचिनदादा कल्याणशेट्टी, माजी आमदार श्री. दिलीप माने, राष्ट्रवादीचे श्री. लतिफभाई तांबोळी यांच्यासह दैनिक पुण्यनगरी समूहातील मान्यवर आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या सर्व मान्यवरांनी आणि संस्थांनी केलेल्या योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!