पिंपरी-चिंचवड मनपाच्या स्थायी समिती बैठकीत महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांना प्रशासक शेखर सिंह यांची मंजुरी!
वैद्यकीय सेवा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत विविध कामांना हिरवा कंदील!
पिंपरी, दि. १७ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत शहराच्या विविध भागांतील विकास प्रकल्पांना आणि महत्त्वाच्या प्रशासकीय खर्चांना प्रशासकांनी मंजुरी दिली, ज्यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे निर्णय
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगर सचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विविध विभागांचे प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. यात आरोग्य सेवा बळकट करण्यापासून ते शहरातील मूलभूत सुविधांच्या सुधारणेपर्यंत विविध कामांचा समावेश आहे.
मंजूर करण्यात आलेले प्रमुख विषय:
स्थायी समिती बैठकीत प्रशासक शेखर सिंह यांनी खालील प्रमुख विषयांना येणाऱ्या खर्चास मान्यता दिली:
- आरोग्य आणि मनुष्यबळ:
- आस्थापनेवरील विशेष तज्ञ व वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर वेतनवाढ.
- जिजामाता रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे पदव्युत्तर, पदवी व पदविका अभ्यासक्रम सुरू करणे.
- मनपा रुग्णालयांसाठी मनुष्यबळ पुरवण्यासाठी एजन्सीची नेमणूक करणे.
- रुग्णालयीन कामकाजासाठी वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, कर्मचारी मनुष्यबळ पुरवठा करणे.
- केमिस्ट पदे मानधनावर भरणे.
- पायाभूत सुविधा आणि स्वच्छता:
- पिंपरी गाव येथील मंदिराजवळील नूतनीकरणाचे विद्युत विषयक कामे.
- कस्पटे वस्ती येथील मैलापाणी पंप हाउससाठी नवीन वीज पुरवठा घेणे.
- ह क्षेत्रीय कार्यालयातील विविध रस्ते सुशोभीकरण देखभाल करणे.
- डायनासोर उद्यान येथून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात नवीन पाईपलाईन टाकणे.
- मोशी, डूडूळगाव, संत तुकारामनगर भागात पाईपलाईन टाकणे.
- दिघी व पाण्याच्या टाकीचे व नजीकच्या वितरण व्यवस्थेविषयक कामे करणे.
- चिखली जलशुद्धीकरण केंद्रावरील स्टेबल ब्लिचिंग पावडर पुरवठा करणे.
- ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते व खोदाई, फूटपथ दुरुस्ती करणे.
- ह, ई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सार्वजनिक शौचालयांची दैनंदिन साफसफाईच्या कामाच्या खर्चास मान्यता.
- अ, ब, इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत उद्यानांची दुरुस्ती व देखभाल करणे.
- चिंचवडे नगर भागातील डांबरी रस्ता दुरुस्ती करणे.
- पावसाळी वाहिन्या, चेंबर्स, पेव्हिंग ब्लॉक दुरुस्ती कामे करणे.
- लांडेवाडी, चऱ्होली, बोपखेल, महिंद्रा पिंपरी येथील पंप हाउस दुरुस्ती कामास मंजुरी.
- थेरगाव स. नं ९, थेरगाव लक्ष्मण नगर, काळाखडक बुस्टर, पुनावळे, सांगवी गावठाण, सानाग्वी पीडब्ल्यूडी, सांगवी स. नं. ८४, पिंपळे गुरव, दापोडी कृष्णानगर, से. २२, पाटीलनगर, जाधववाडी, से. १०, गवळीमाथा रहाटणी, लांडेवाडी, दिघी, चऱ्होली, बोपखेल येथील पंप हाउस चालन करणे.
- पिंपरी लेव्हल पंपिंग स्टेशन निष्काशीत करणे.
- सुरक्षा आणि प्रशासन:
- क्रांतिवीर चाफेकर राष्ट्रीय स्मारक, नवीन तालेरा रुग्णालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था कासारवाडी व मोरवाडी, अभिलेख कक्ष नेहरूनगर येथे मेस्को मार्फत सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देणे.
- चिखली येथील अनधिकृत बांधकामाच्या निष्कासन वेळी वापरलेल्या ड्रोनचे भाडे देणे.
- करआकारणी व कर संकलन विभागासाठी १० कर्मचारी नियुक्त करण्याच्या खर्चास मान्यता देणे.
- शैक्षणिक आणि सांस्कृतिक:
- २०२५-२६ शैक्षणिक वर्षाकरिता क्रमिक पुस्तके खरेदी करणे.
- अ, फ क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग क्र. १३, १, ११,१२ येथे औष्णिक धुरीकरणासाठी रिक्षा टेम्पो वाहन खर्चास मान्यता.
- इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्र. क्र. ३,४,५, ७ येथील वॉल पेंटिंग कामकाजाच्या खर्चास मान्यता देणे.
- भोसरी सहल केंद्र उद्यान व अंकुशराव लांडगे नाट्यगृह उद्यान देखभाल व संरक्षण कामकाजास मान्यता.
- उद्यान विभागात शोभिवंत रोपे तयार करणे व देखभाल खर्चास मान्यता.
- भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी २०२५ आयोजन करणे.
- पालखी व गणपती उत्सव, इतर उत्सवांसाठी स्वच्छतागृह पुरविणे.
- नवीन प्रकल्प:
- प्रभाग क्र. १६ मधील पेठ क्र. ३०, सर्वे नं ७७ येथे स्वामी विवेकानंद क्रीडांगणचे मैदानात रूपांतर करणे.
- प्रभाग क्र. २० येथील महेशनगर चौकातील मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणे.
- विविध विभागासाठी स्कॅनर खरेदी करणे.
या सर्व कामांना मंजुरी मिळाल्याने पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला अधिक गती मिळणार असून, नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.