उद्योजकांच्या स्वप्नांना ‘एस प्रो’ची भरारी: टाटा मोटर्सकडून भारतातील सर्वात किफायतशीर ‘फोर-व्हीलर मिनी-ट्रक’ लाँच, किंमत फक्त ₹३.९९ लाखांपासून!
पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक पर्यायांत उपलब्ध; ‘२५ वर्षांचा वारसा’ घेऊन ‘नवीन पिढी’साठी ‘नफ्या’ची हमी, आर्थिक सक्षमीकरणाचा नवा अध्याय!
पुणे, २३ जून २०२५: भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने आज (सोमवार, २३ जून) लहान कार्गो मोबिलिटीमध्ये क्रांती घडवणारा नवीन टाटा एस प्रो (Tata Ace Pro) लाँच करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ₹३.९९ लाख (सुरुवातीची किंमत) पासून सुरू होणारा टाटा एस प्रो हा भारतातील सर्वात किफायतशीर चार-चाकी मिनी-ट्रक असून, तो अपवादात्मक कार्यक्षमता, अद्वितीय वैविध्यता आणि उच्च दर्जाचे मूल्य देतो. हा मिनी-ट्रक भारतातील उद्योजकांच्या भावी पिढीला सक्षम करण्यासाठी आणि कार्गो मोबिलिटीमध्ये नवीन युगाचा शुभारंभ करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
‘एस प्रो’ची वैविध्यता: आपल्या गरजेनुसार पर्याय निवडा!
उद्योजकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेला टाटा एस प्रो पेट्रोल, बाय-फ्यूएल (सीएनजी + पेट्रोल) आणि इलेक्ट्रिक (EV) अशा तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या व्यवसायाच्या आवश्यकतेनुसार योग्य सोल्यूशन निवडण्याची लवचिकता मिळते.
ग्राहकांना देशभरातील टाटा मोटर्सच्या १२५० व्यावसायिक वाहन विक्री टचपॉइंट्सपैकी कोणत्याही ठिकाणी किंवा टाटा मोटर्सचे ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्म ‘फ्लीट व्हर्स’ (Fleet Verse) वर त्यांचे पसंतीचे एस प्रो व्हेरिएंट बुक करता येईल. टाटा एस प्रोची मालकी अधिक सोयीस्कर करण्यासाठी, टाटा मोटर्सने आघाडीच्या बँका आणि NBFCs सोबत सहयोग केला आहे. या सहकार्यातून त्वरित कर्ज मंजूरी, स्थिर EMI पर्याय आणि सुधारित फंडिंग सपोर्टसह विनासायास फायनान्सिंग सोल्यूशन्स उपलब्ध असतील, ज्यामुळे ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता सुनिश्चित होईल.
टाटा एसचा २ दशकांचा वारसा: ‘प्रगती व क्षमतेचे प्रतीक’
एस प्रो लाँच करताना टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्हणाले, “पूर्वी लाँच करण्यात आलेल्या टाटा एसने भारतातील कार्गो मोबिलिटीमध्ये क्रांती घडवून आणली. गेल्या दोन दशकांमध्ये या ट्रकने २५ लाखांहून अधिक उद्योजकांना यशस्वीरित्या सक्षम केले आहे, तसेच प्रगती व क्षमतेचे प्रतीक बनला आहे. नवीन टाटा एस प्रोसह आम्ही महत्त्वाकांक्षी भावी पिढीसाठी नवीन उद्देशासह हा वारसा अधिक दृढ करत आहोत. स्थिरता, सुरक्षितता आणि नफ्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या एस प्रोमध्ये उत्तम उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता आहे, जो उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास सज्ज असलेल्या महत्त्वाकांक्षी उद्योजकांच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्यास मदत करेल.”
टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्सच्या एससीव्हीपीयूचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. पिनाकी हलदर म्हणाले, “उद्देशपूर्ण टाटा एस प्रो सखोल ग्राहक अभिप्रायांसह विकसित करण्यात आली आहे आणि विविध उपयोजनांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. विविध प्रदेश व हवामान स्थितींमध्ये, तसेच लाखो किलोमीटर अंतरापर्यंत या ट्रकची प्रखर चाचणी करण्यात आली आहे. मल्टी-फ्यूएल पर्याय, किफायतशीरपणा आणि सुधारित ड्रायव्हिंग क्षमतेसह टाटा एस प्रो विविध वापरांमधून उच्च दर्जाचे मूल्य देतो. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे व नागपूर अशी प्रमुख शहरे FMCG, फ्लीट लॉजिस्टिक्स, डार्क स्टोअर्स व पेय वितरण अशा क्षेत्रांमध्ये एस प्रो ईव्हीच्या फिक्स्ड-ड्युटी चक्रांसाठी विशेषत: अनुकूल आहेत. कोकण, विदर्भ व मराठवाडा यांसारख्या प्रांतांमध्ये कृषी-आधारित उद्योग आणि MSMEs ची संपन्न परिसंस्था आहे, जिथे एस प्रोची उच्च लोड क्षमता, सुसंगत आकारमान आणि इंधन-कार्यक्षम ड्राइव्हट्रेन्स व्यावहारिक व लाभदायी सोल्यूशन देतात.”
‘एस प्रो’ची वैशिष्ट्ये: अधिक सुविधा, अधिक क्षमता!
टाटा एस प्रो हा अधिक सुविधा देण्यासाठी डिझाइन केलेला ट्रक आहे.
- अपवादात्मक पेलोड क्षमता: टाटा एस प्रो ७५० किलो पेलोड आणि वैविध्यपूर्ण ६.५ फूट (१.९८ मीटर) डेकसह नवीन मापदंड स्थापित करतो. फॅक्टरी-फिटेड लोड बॉडी पर्याय – हाफ-डेक किंवा फ्लॅटबेडसह उपलब्ध असलेला हा ट्रक विविध उपयोजनांमधून उत्पन्न वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
- कार्यक्षम, वैविध्यपूर्ण पॉवरट्रेन्स: मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर निर्माण आणि लाभक्षमतेसाठी डिझाइन केलेला एस प्रो पेट्रोल, बाय-फ्यूएल आणि इलेक्ट्रिक व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे:
- पेट्रोल: ६९४ सीसी इंजिन ३० बीएचपी शक्ती आणि ५५ एनएम टॉर्क देते, ज्यामुळे पॉवर व इंधन कार्यक्षमतेचे उत्तम संयोजन मिळते.
- इलेक्ट्रिक (EV): टाटा मोटर्सचे प्रगत ईव्ही आर्किटेक्चर ३८ बीएचपी शक्ती, १०४ एनएम टॉर्क आणि सिंगल चार्जमध्ये १५५ किमीची रेंज देते. सर्व हवामानात विश्वसनीय ड्रायव्हिंगसाठी यात IP67-प्रमाणित बॅटरी व मोटर आहे.
- बाय-फ्यूएल: सीएनजीच्या किफायतशीर कार्यक्षमतेसह विनासायास कार्यसंचालनांसाठी ५-लिटर पेट्रोल बॅकअप टँकची स्थिरता आहे. सीएनजी मोडमध्ये हा ट्रक २६ बीएचपी शक्ती आणि ५१ एनएम टॉर्कची निर्मिती करतो.
- आरामदायी, सुरक्षित केबिन: रस्त्यावर दीर्घकाळापर्यंत प्रवास करण्यासाठी डिझाइन केलेल्या एस प्रोमध्ये ऐसपैस जागा, कार-सारखी केबिनसह एर्गोनॉमिक सीटिंग, ऐसपैस स्टोरेज आणि आधुनिक सोयीसुविधा आहेत. AIS096-प्रमाणित क्रॅश-टेस्टेड केबिनसह सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. यात अतिरिक्त ड्रायव्हर सोयीसुविधेसाठी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि पर्यायी इन्फोटेनमेंट सिस्टिम देखील आहे.
- स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि ड्रायव्हर असिस्टन्स: प्रगत एस प्रोला पूरक टाटा मोटर्सचे कनेक्टेड व्हेईकल प्लॅटफॉर्म ‘फ्लीट एज’ आहे, जे ८ लाखांहून अधिक नोंदणीकृत व्हेईकल्समध्ये आहे. हे प्लॅटफॉर्म व्हेईकल हेल्थ, ड्रायव्हरची ड्रायव्हिंग वर्तणूक आणि अंदाजातत्मक मेंटेनन्सबाबत रिअल-टाइम माहिती देते, ज्यामुळे वाहतूकदारांना सक्रिय सुरक्षितता निर्णय घेता येतात. गिअर शिफ्ट अडव्हायजर आणि रिव्हर्स पार्किंग असिस्टन्स यासारखी वैशिष्ट्ये शहरात व ग्रामीण भागांमध्ये नेव्हिगेशन प्रभावी करतात.
- अद्वितीय सपोर्ट आणि मालकीहक्क अनुभव: देशभरात २,५०० हून अधिक सर्विस व स्पेअर्स आउटलेट्स, तसेच दुर्गम भागांमध्ये स्टार गुरू नेटवर्क असल्यामुळे एस प्रोला सहजपणे तज्ञांची सहाय्यता उपलब्ध होते. ईव्ही-संबंधित सर्विस सेंटर्स आणि प्रबळ २४x७ रोडसाइड असिस्टन्स प्रोग्राम यामुळे अपटाइम आणि मनःशांती मिळते.
टाटा एस प्रोचे लाँचिंग हे भारतातील लहान व्यावसायिक वाहन सेगमेंटमध्ये एक मैलाचा दगड ठरणार असून, अनेक उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी एक विश्वासार्ह आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध होईल.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव
