उद्योजकांसाठी निगडीत ‘एमएसएमई’ महोत्सवाचे आयोजन: ‘एक दिवस एमएसएमईच्या नावावर’ उपक्रमातून मार्गदर्शन!
२७ जून रोजी ICAI भवनमध्ये होणार हा कार्यक्रम; तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि स्टार्टअप क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती!
पिंपरी, दि. २४ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी चालून आली आहे! निगडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) यांच्या वतीने उद्योजकांसाठी “एक दिन एमएसएमई के नाम” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती आयसीएआयचे अध्यक्ष सीए वैभव मोदी यांनी दिली.
कधी आणि कुठे?
हा कार्यक्रम २७ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता निगडीतील सिद्धी विनायक नगरी रोड, जकात नाक्यामागे, ट्रान्सपोर्ट नगर येथील ICAI भवनमध्ये होणार आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि मान्यवरांची उपस्थिती
यावेळी उद्योजकांना विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. एमएसएमई मंत्रालयाचे प्रतिनिधी, गुंतवणूक सल्लागार, कलाकार, बँक प्रतिनिधी आदी उद्योग आणि स्टार्टअप क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून उद्योजकांना मोलाचे मार्गदर्शन करतील.
या कार्यक्रमाला अॅड. जमशेद मिस्त्री, सीए महेश्वर मराठे, सीए संतोष एच. दोशी, इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अंनत गोणवंडे, सीए निपुण सिकरी, मुस्तफा हुसेनवाला, तुषार शेट्टी, अनंत निपुणचा, पॉला मॅकग्लिन, आयली घिया, मोनिका राजदान, आकाश सुरेका, विश्वेश जिरगले, रशना जेहानी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शहरातील सर्व उद्योजकांनी या संधीचा लाभ घेऊन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा महोत्सव सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना (MSME) त्यांच्या व्यवसायात नवीन दिशा देण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
