news
Home अकोला ‘ज्ञान नर्मदा’चा पुढाकार: शाहू जयंतीनिमित्त मुर्तीजापूरमध्ये ‘सेवे’चा जागर, नवजात बालकांना कपडे व रुग्णांना फळे वाटप!

‘ज्ञान नर्मदा’चा पुढाकार: शाहू जयंतीनिमित्त मुर्तीजापूरमध्ये ‘सेवे’चा जागर, नवजात बालकांना कपडे व रुग्णांना फळे वाटप!

आरक्षणाचे जनक आणि समाजसुधारकाच्या कार्याचे स्मरण; लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयात विशेष कार्यक्रम संपन्न. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अनोखे अभिवादन: नवजात बालकांना कपडे वाटप!

 

 

ज्ञान नर्मदा संस्थेचा स्तुत्य उपक्रम; मुर्तीजापूरच्या लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयात शाहू जयंती साजरी!

 

मुर्तीजापूर, दि. २७ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): बहुजनांचे उद्धारक, आरक्षणाचे जनक लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मुर्तीजापूर येथे एका अनोख्या आणि स्तुत्य उपक्रमाने त्यांना अभिवादन करण्यात आले. ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेने लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मुर्तीजापूर येथे नवजात शिशु बालकांना कपडे वाटप करून आणि रुग्णांना फळे, बिस्किटे, मिठाई वाटप करून शाहू महाराजांच्या कार्याला आदरांजली वाहिली.


 

ज्ञान नर्मदा संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय!

 

ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनीता विष्णू लोडम यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाहू महाराजांनी शैक्षणिक विकास, जातीय निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचे आणि बहुजनांचे उद्धार, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास अशा विविध क्षेत्रांत केलेल्या मोलाच्या कामगिरीचे स्मरण या उपक्रमातून करण्यात आले.


 

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात

 

या कार्यक्रमासाठी अटल फाउंडेशन अकोला जिल्हाध्यक्ष सौ. रूपाली तिडके यांनी अध्यक्षस्थान भूषवले. तर वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे, डॉ. मंदार मुळे, रुग्णसेवक विष्णू लोडम, डॉ. स्वाती पोटे, कविता साखरे, अनघा द्यामोरे, माया दवंडे, सचिन धामोरे, नम्रता भिंगारे, सहाय्यक अधीक्षक संजय गणोरकर, विजय डांगे, नितीन देशमुख, नानासाहेब चेडे, माजी मुख्याध्यापक रामकृष्ण आसरे, ज्ञानेश्वर भड गुरुजी, मेजर वैभव भगत, विनोद इंगळे, शिवकन्या कु. शिवानी श्रीराव, कु. विभूती लोडम, सुनिता भुजाडे, अतुल गावंडे, रेखा कोथळकर, राम लोडम इत्यादी मान्यवर आणि संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि लक्ष्मीबाई देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि पूजनाने करण्यात आली.


 

शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण आणि लक्ष्मीबाई देशमुख यांच्या दातृत्वाला उजाळा

 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. रूपालीताई तिडके यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच ज्ञान नर्मदा संस्थेमार्फत सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. रुग्णसेवक विष्णू लोडम यांनी आपल्या भाषणात दानशूर लक्ष्मीबाई देशमुख यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून रुग्णसेवेकरिता आपली शेकडो एकर जमीन दान करून जनसेवेत समर्पित करून अतिशय महान कार्य केले, असे विचार मांडले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हॅपी वुमन्स क्लबच्या महिला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन विजय डांगे यांनी केले, तर आभार कु. शिवानी श्रीराव यांनी मानले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!